कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेल्या 24 तासात तर कोल्हापुरात उच्चांकी 53 जणांचा मृत्यू झाला असून 1553 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 1018 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा 10 हजार 274 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 73 हजार 381 इतकी झाली आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण
18:14 May 06
कोल्हापुरात गुरुवारी तब्बल 53 जणांचा कोरोनाने मृत्यू; 1553 नवे रुग्ण
17:00 May 06
सांगली जिल्ह्यात 8 दिवसाच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात
सांगली - कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात बुधवारपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
15:37 May 06
आरोग्य विभागात तातडीने 16 हजार पदे भरणार - राजेश टोपे
मुंबई - राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार आहेत. तर क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्याची प्रक्रिया लगेच सुरु होईल, असे टोपे म्हणाले.
14:51 May 06
लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईकरांना भीती, लसीकरणाला गर्दी
मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. लसीकरणाला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिका नोंदणी करून लसीकरणाला येण्याचे आवाहन करते. मात्र तिथे गेल्यावर आपल्याला पुढे लस मिळेल की नाही, याची भीती असल्याने नागरिक लसीचा साठा आल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहे.
12:08 May 06
ऑक्सिजनसाठी पालिकेने केल्या या उपाययोजना, सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार फेब्रुवारीपासुन पुन्हा वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला. रुग्णांना ऑक्सिजन नसल्याने 168 रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले. याची दखल घेत पालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. यामुळे पालिकेने केलेल्या कामाची देशभरात दखल घेतली जात आहे.
12:07 May 06
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी तुफान गर्दी...
अहमदनगर : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात 6 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना प्रथम लस देण्यात येत असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधीत लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेल्याच चित्र पहावयास मिळात आहे. यावेळी गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोहचलेल्या डॉक्टरांनाही धक्काबुक्की झाल्याचे माहिती ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सचिन जोशी यांनी यांनी दिली आहे.
12:05 May 06
अकलूज येथे रेमडेसिविरचा इंजेक्शनचा काळाबाजार, पोलिसांकडून तिघा जणांना अटक
पंढरपूर - माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलिसांनी रेमडेसिविरचा इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या रेमडेसिविरचा इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयाने आरोपींना ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
12:05 May 06
साईसंस्थानचा ऑक्सीजन प्रकल्पाचा येत्या दोन दिवसात कार्यान्वित..
शिर्डी : भाविकांच्या दातृत्वातून उभारण्यात येणारा ऑक्सीजन निर्मीती प्रकल्प व कोविड तपासणी प्रयोगशाळा उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील एक दोन दिवसांत ऑक्सीजन प्रकल्पाची चाचणी होईल असे संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी सांगितले.
10:44 May 06

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. लसीकरणाला मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. पालिकेने नोंदणी करून लसीकरणाला येण्याचे आवाहन करूनही आपल्याला पुढे लस मिळेल की नाही याची भीती असल्याने लसीचा साठा आल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे.
10:20 May 06
आज बीकेसीत ज्येष्ठाचे लसीकरण नाही; 18 ते 44 वयोगटातील केवळ 500 जणांना दिला गेला पहिला डोस..
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमे अंतर्गत आज बीकेसी कोविड सेंटर मध्ये केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले गेले. 500 जणांना पहिला डोस दिला गेला. तर अपुऱ्या डोसमुळे 45 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण आज बंद होते अशी माहिती डॉ राजेश डेरे यांनी दिली आहे.
10:15 May 06
अमरावती जिल्ह्यातील तिवसा, धारणी शहर सील..
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. अमरावतीच्या तिवसा आणि धारणी शहरात देखील कोरोनाने कहर केल्याने प्रशासनाने धारणी आणि तिवसा शहर कडेकोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
09:45 May 06
परळीत कोविड लसीकरण प्रक्रियेत प्रचंड घोळ; लस दिल्याचे प्रमाणपत्र दिले, पण लस दिलीच नाही..
परळी : परळी येथील सावतामाळी मंदिर परिसरातील खंडोबा मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 मे 2021 रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या लसीकरण मोहिमेत एका महिलेला लस न मिळताच तिला लसीकरण दिले असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. तरी तिच्या नावाची लस दुसऱ्याच कोणीतरी घेतली असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी केली आहे.
08:43 May 06
अहमदनगर - बारामती ऍग्रो कडून जिल्हा रुग्णालयाला चाळीस ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर भेट
अहमदनगर- यशस्वी उद्योजकतेला समाजकार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे सातत्य बारामती ऍग्रो लिमिटेडने कायम राखलेले आहे. याच दृष्टिकोनातून कोरोना च्या या संकटमय परिस्थितीत बारामती ऍग्रो कंपनी लिमिटेड कडून आमदार रोहित पवार आणि बारामती ऍग्रोच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा आरोग्य व्यवस्थेसाठी 40 ऑक्सिजन कोसंस्ट्रेटर उपकरणे अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
08:42 May 06
लॉकडाऊनची ऐशीतैशी; अमरावतीत रात्री भरतोय बाजार
अमरावती - कोरोनमुळे संपूर्ण व्यवस्था जेरीस आली असताना कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित आहे. मात्र तरीही अमरावती शहरात पठाण चौक, जमिल कॉलनी या भागात रात्री चक्क बाजार भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
07:00 May 06
अदर पूनावाला आणि कुटुंबीयांना झेड-प्लस सुरक्षा द्या; मुंबई उच्च न्यायालयात याचिका..
मुंबई - अदर पुनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना झेड-प्लस सुरक्षा पुरवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
06:56 May 06
पोलिसांकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण: आरोग्य कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन; लसीकरण खोळंबले
बीड - संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी सध्या पोलीस कारवाई करीत आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची कोणतीच खात्री न करता त्यांनाही मारहाण करणे, अडवून दंड करण्याचे प्रकार काल जिल्ह्यात पहायला मिळाले आहेत. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे यांना बीड येथील चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी बेदम मारल्याच्या निषेधार्थ आष्टी तालुका आरोग्य संघटनेच्या वतीने आज (दि. ६) रोजी कामबंद अंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील लसीकरणही खोळंबले आहे.
06:23 May 06
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - आज (दि. 5 मे) दिवसभरात 57 हजार 6 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 41 लाख 64 हजार 98 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. असे असले तरी राज्यात नव्या 57 हजार 640 रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवशी 920 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
- राज्यात 57 हजार 6 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
- राज्यात आतापर्यंत 41लाख 64 हजार 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
- राज्यात नव्या 57 हजार 640 रुग्णांची नोंद झाली आहे.
- राज्यात 24 तासांत 920 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.
- राज्यात एकूण 48लाख 80 हजार 542 रुग्णांची नोंद झाली.
- राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 41 हजार 596 इतकी झाली.