मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शनिवारी 889 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 738 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
8,237 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 889 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 33 हजार 612 वर पोहचला आहे. तर आज 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 908 वर पोहचला आहे. आज 738 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 80 हजार 799 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 52 लाख 56 हजार 850 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी
10.17 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 87 हजार 522 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 8 हजार 237 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हे ही वाचा - New Covid Variant Omicron : नवीन विषाणूत 30 पेक्षा जास्त म्युटेशन, वेगाने पसरतो - डॉ. अविनाश भोंडवे
रुग्णसंख्येत चढ उतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906, 20 नोव्हेंबरला 833, 21 नोव्हेंबरला 845, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 24 नोव्हेंबरला 960, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 27 नोव्हेंबरला 889 रुग्ण आढळून आले आहेत.
हे ही वाचा - Omicron : राज्यात एकही रुग्ण नाही, आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदीची मागणी तर परदेशी पर्यटकांची होणार जिनोम टेस्ट
मृत्यू संख्येत चढ उतार -
तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18 नोव्हेंबरला 24, 19 नोव्हेंबरला 15, 20 नोव्हेंबरला 15, 21 नोव्हेंबरला 17, 22 नोव्हेंबरला 8, 23 नोव्हेंबरला 19, 24 नोव्हेंबरला 41, 25 नोव्हेंबरला 50, 26 नोव्हेंबरला 34, 27 नोव्हेंबरला 17 मृत्यूंची नोंद झाली आहे.
..या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 210
अहमदनगर - 83
पुणे - 78
पुणे पालिका - 96
पिंपरी चिंचवड पालिका - 33