ETV Bharat / city

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने - मुंबई उच्च न्यायालय

करोनाग्रस्तांची संख्या राज्यात वाढत आहे. त्यामुळे सर्व स्तरांवर खबरदारी घेतली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपासून कामकाज प्रत्यक्ष आणि ऑनलाईन ( Mumbai High Court Working Online And offline ) पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

mumbai high court
mumbai high court
author img

By

Published : Jan 1, 2022, 4:54 PM IST

मुंबई : राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत ( Maharashtra Corona And Omicron Cases Increased ) आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वरिष्ठ न्यायमूर्तीच्या प्रशासकीय समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार ( दि 4 जानेवारी 2022 ) पासून एक आठवडा न्यायालयीन कामकाज प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला ( Mumbai High Court Working Online And offline )आहे.

यासंदर्भात वरिष्ठ न्यायमूर्तीच्या प्रशासकीय समितीने बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारतर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच उच्च न्यायालयातील वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी रामास्वामी आणि काकाणी यांनी राज्य व मुंबईतील सध्याच्या कोरोना स्थितीची माहिती दिली.

सोमवाारी प्रत्यक्ष सुनावणी

या बैठकीत 8 जानेवारीला परिस्थितीचा आढावा घेऊन कामकाज प्रत्यक्ष व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समितीने स्पष्ट केले. तसेच, पक्षकारांच्या प्रवेशावर या निर्णयानुसार निर्बंध आणण्यात येणार आहे. शिवाय प्रत्यक्ष सुनावणीसाठी अत्यंत आवश्यक असेल तरच आपल्या कनिष्ठ वकील किंवा प्रशिक्षणार्थींना सोबत ठेवावे, असे आवाहनही वकील संघटनांनी वरिष्ठ वकिलांना करण्याचे ठरले. सोमवारची प्रकरण सूची तयार झाल्याने त्या दिवशी प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. परंतु, असे असले तरी सोमवारी केवळ तातडीने सुनावणीच्या आवश्यक असलेल्या प्रकरणांचे अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा -Monkey In Washim : जखमी माकडाचा जीव वाचविण्यासाठी इतर माकडांनी केला तासभर रास्ता रोको

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.