मुंबई - राज्यात थकीत बिल आणि वीज टंचाईचा मोठा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. दरम्यान दर आठवड्याला विजेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली जाईल, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यात वीज थकबाकीदारांच्या आकडा मोठा आहे. ही थकबाकी वसूल केली जाणार आहे. थकबाकीदारांचे यामुळे धाबे दणाणले आहेत.
गुजरातकडून वीज खरेदी - राज्यात वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढत आहे. परंतु कोळशाचा तुटवडा असल्याने अपेक्षित वीज पुरवठा करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर गुजरात राज्याकडून 760 मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तरीही वीजपुरवठा करणे जिकरीचे बनले आहे. थकीत वीज बिलांकडे राज्य सरकारने यामुळे लक्ष्य वेधले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिल आणि विज टंचाईबाबत आढावा घेतला. ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री आणि इतर विभागाचे मंत्री उपस्थित होते. दरम्यान, दर आठवड्यात विजेचा वापर आणि थकीत बिल वसुलीबाबत माहिती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा खात्याला दिल्या आहेत.
हेही वाचा - Kieron Pollard Retirement : कायरन पोलार्डचा धक्कादायक निर्णय; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती