ETV Bharat / city

Maharashtra Cabinet Expansion : 18 आमदारांचा शपथविधी, आरोप-प्रत्यारोप...; 'असा' राहिला मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस - 39 दिवसांपासून लांबलेला विस्तार

भाजपा व शिंदे गटाचे ( BJP and Shinde group ) प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांना मंत्रिपदाची ( 18 MLAs sworn as ministers ) संधी मिळाली आहे. यात एकही महिलेला संधी मिळालेली नाही, तर वादग्रस्त अब्दुल सत्तार आणि संजय राठोडांची या नव्या मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. एकंदरीतच आज सकाळपासून मंत्रिमंडळ विस्तार कसा राहिला? याचा आढावा या रिपोर्टमधून...

Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion
author img

By

Published : Aug 9, 2022, 9:05 PM IST

मुंबई - राज्य मंत्रिमंडाळाचा 39 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर मंगळवारी ( आज ) सकाळी राजभवनात पार पडला. त्यात भाजपा व शिंदे गटाचे ( BJP and Shinde group ) प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांना मंत्रिपदाची ( 18 MLAs sworn as ministers ) संधी मिळाली आहे. यात एकही महिलेला संधी मिळालेली नाही, तर वादग्रस्त अब्दुल सत्तार आणि संजय राठोडांची या नव्या मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. एकंदरीतच आज सकाळपासून मंत्रिमंडळ विस्तार कसा राहिला? याचा आढावा या रिपोर्टमधून...

'असा' राहिला शपथविधी सोहळा : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना शपथ दिली. भाजपाकडून मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे व मंगल प्रभात लोढा या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे गटातील संदिपान भुमरे, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत व शंभूराज देसाई या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

सह्याद्रीवर सुरु होते बैठकांचे सत्र : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू होती. या बैठकीत कोणाला मंत्रिपद द्यायचे हे नाव निश्चित होणार यावर चर्चा झाली. सोबतच अब्दुल सत्तार यांना मंत्री करायचे की नाही यावरही या बैठकीत सल्लामसलत झाले. 30 जून रोजी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर दोघांनीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन पेट्रोलवरील कर कमी करणे, शेतकऱ्यांना अनुदान यांसारखे निर्णय घेतले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नव्हता. त्यामुळे सत्ताधारी आमदारांत धाकधूक वाढली होती, तर विरोधी पक्षांचे नेतेही शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करत होते. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीत 6 वाऱ्या झाल्या होत्या.

संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांवरुन विरोधकांची टीका : आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने विरोधकांनी चांगली टीका केली. राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणाचा आरोप असताना कॅबिनेटमध्ये कसा समावेश झाला? असा सवालही विरोधकांनी विचारला. यावरुनही दिवसभर बऱ्याच घडामो़डी घडल्या. यावर स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना महाविकास आघाडी सरकारच्याच काळामध्ये क्लीनचिट मिळाल्याचे सांगत विरोधकांना प्रतिउत्तर दिले. तर टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी आमदार अब्दुल सत्तारांवरही विरोधांना टीका केली. यावरुन बराच गोंधळ पाहायला मिळाला.

खातेवाटप बाबत निर्णय : मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणी आमदार नाराज नाही. जर, कोणी आमदार नाराज असेल तर, त्याची नाराजी पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दूर केली जाईल. तसेच राज्यामध्ये असलेलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करेल. गेल्या अडीच वर्ष महाराष्ट्रात असलेले महाविकास आघाडीचे सरकारमध्ये महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र, आता नवीन सरकार हे जनतेसाठी काम करेल. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकली असून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, अशी आशा एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे सरकारमधील संभाव्य खातेवाटप :

एकनाथ शिंदे गट :

1) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगर विकास खाते

2) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा खाते

3) दादा भुसे - कृषी खाते

4) संजय राठोड - ग्रामविकास खाते

5) संदिपान भुमरे - रोजगार हमी खाते

6) उदय सामंत - यांना उद्योग खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते

7) तानाजी सावंत - यांना उच्च व तंत्रशिक्षण खाते

8) अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विभाग खाते

9) दीपक केसरकर - यांना पर्यटन आणि पर्यावरण खाते

10) शंभूराजे देसाई - यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते

भारतीय जनता पक्ष :

11) देवेंद्र फडणवीस - गृह व अर्थखाते

12) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा आणि वन खात्याची जबाबदारी

13) राधाकृष्ण विखे पाटील - सहकार खाते

14) गिरीश महाजन - जलसंपदा खाते

15) चंद्रकांत पाटील - सार्वजनिक बांधकाम विभाग खाते

16) सुरेश खाडे - यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्री खाते पदाची जबाबदारी

17) रवींद्र चव्हाण - यांना गृहनिर्माण खाते

18) अतुल सावे - यांच्यावर आरोग्य खात्याची जबाबदारी असेल

19) मंगल प्रभात लोढा - यांच्यावर विधी व न्याय विभागाची जबाबदारी असेल

20) विजयकुमार गावित - आदिवासी विकास खाते

हेही वाचा - Ministerial Distribution : एकनाथ शिंदे सरकारचे संभाव्य खातेवाटप; अशी असेल मंत्र्यांवर जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.