मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प मांडला. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यात शिक्षण विभागासाठी 2 हजार 525 कोटी रुपये तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा... महा'अर्थ': आरोग्य विभागासासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद
राज्यातील 1500 शाळा आदर्श करणार...
शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी येथील शाळेच्या धर्तीवर राज्यातील 1500 शाळा आदर्श शाळा म्हणून नावारुपाला आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
शिक्षण विभागासाठी तरतुद :
- पुढील 4 वर्षात प्रत्येक तालुक्यात किमान 4 अशा एकूण 1500 हजार शाळांना आदर्श बनवणार. यासाठी 500 कोटींचा निधी उभारणार.
- रयत शिक्षण संस्थेचा शतक महोत्सवी वर्षानिमित्त 11 कोटींची तरतुद
- क्रीडा विकासासाठी तालुका तालुका क्रीडा संकुलाची अनुदान मर्यादा 1 कोटी वरुन 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार
- जिल्हा क्रीडा संकुलाच्या अनुदानाची रक्कम 8 कोटीवरुन 25 कोटी रुपये पर्यंत वाढवणार
- विभागीय संकुलाच्या अनुदानाची रक्कम 24 कोटी रुपयांवरुन 50 कोटी पर्यंत वाढवणार
- शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करणार
- शिक्षण विभागासाठी 2 हजार 525 कोटी रुपये, उच्च शिक्षण विभागासाठी 1300 कोटी रुपये