द्वेष पसरवणे खूप सोपे आहे. एखाद्याचा अपमान करणे खूप सोपे आहे, परंतु द्वेष आणि अपमान तुम्हाला कधीही राष्ट्र निर्माण करू देणार नाही, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केरळमध्ये म्हटले आहे.
SC Hearing Live : द्वेष आणि अपमान तुम्हाला कधीही राष्ट्र निर्माण करू देणार नाही - टुडे लेटेस्ट न्यूज
20:12 September 27
द्वेष आणि अपमान तुम्हाला कधीही राष्ट्र निर्माण करू देणार नाही
18:57 September 27
गुजरातमध्ये आतापर्यंत 4 कोटी ८३ लाख मतदार नोंदणीकृत
गुजरातमध्ये आतापर्यंत 4.83 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. 182 विधानसभा मतदारसंघात 51,782 मतदान केंद्रे उभारली जातील, असे गांधीनगर येथे पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे सीईसी राजीव कुमार यांनी सांगितले.
16:50 September 27
खरी शिवसेना कोण, निवडणूक आयोग ठरविणार, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
खरी शिवसेना कोण, निवडणूक आयोग ठरविणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
16:48 September 27
आमची कार्यवाही सुरू ठेवू द्या, निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात विनंती
पक्षात गट असतात. आमची कार्यवाही सुरू ठेवू द्या, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात विनंती केली आहे.
16:42 September 27
घटनापीठातील न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू
घटनापीठातील न्यायमूर्तींचा एकमेकांशी संवाद सुरू आहे.
16:32 September 27
पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर तुम्ही पक्ष सोडल्याचे गृहित धरले जाते
पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर तुम्ही पक्ष सोडल्याचे गृहित धरले जाते, असा युक्तीवाद उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
16:17 September 27
शिंदे अपात्र झाले तरी त्यांना सदस्य मानले जात आहे, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

16:09 September 27
इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार, जाणून घ्या मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
मंत्रिमंडळ निर्णय
•राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.
(अन्न व नागरी पुरवठा विभाग)
• राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. (नियोजन विभाग)
• नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना.
(नगर विकास विभाग)
• पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण वीस हजार पदे भरणार
(गृह विभाग)
• इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
• इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
• उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविली.
(अल्पसंख्यांक विकास विभाग)
• वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार.
(वन विभाग)
• राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू.
(वैद्यकीय शिक्षण विभाग)
• दुय्यम न्यायालयातील न्यायीक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायीक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय
(विधि व न्याय विभाग)
• महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय.
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
• महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेणार. दुरुस्तीसह पुन्हा लागू करणार
(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
• एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ.
(महसूल विभाग)
• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार
(सामान्य प्रशासन विभाग
16:08 September 27
एकनाथ शिंदे सेनेचे प्राथमिक सदस्य नाहीत, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद
उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सेनेचे प्राथमिक सदस्य नाहीत, असा युक्तीवाद केला आहे.
15:35 September 27
कोणत्याही राजकीय पेचावरती निर्णयाचा अधिकार निवडणूक आयोगाची भूमिका
केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील दातार यांनी निवडणूक आयोगाचा युक्तीवाद करताना भूमिका मांडली आहे. राजकीय पेचावरती निवडणूक निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
15:25 September 27
निवडणूक आयोगाला त्यांचे काम करू द्यावे, राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी मांडली बाजू
राज्यपालांच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. कोणती शिवसेना खरी? याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यायचे, असा त्यांनी युक्तीवाद केला आहे.
15:02 September 27
निवडणूक आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार - कौल
निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार, परिशिष्ट २५ आणि २६ नुसार निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे - निरज किशन कौल
13:23 September 27
पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही; शिंदे गटाचे वकील
पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही, हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकाराचा वापर करून न्यायालयाने निर्णय घ्यावा अशी तुमची इच्छा आहे. मी तुम्हाला काही निर्णय दाखवतो असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला आहे.
13:23 September 27
अपात्र ठरल्यास काय? सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला विचारणा
समजा, जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जात आहे ती अपात्र ठरली तर त्यांच्या वैधतेवर आणि अधिकारक्षेत्रावर परिणाम होतो का? अशी विचारणा घटनापीठाने यावेळी केली. यावर शिंदे गटाच्या वकिलांनी, सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्णय घेण्यास रोखलेलं नाही. त्यांचा निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णयही अबाधित आहे अन्यथा कोर्टाने त्यांना रोखलं असतं. कामकाजातही ते सहभागी होत आहेत अशी माहिती दिली.
12:48 September 27
यांना प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाकडे का यायचं आहे? शिंदे गटाची विचारणा
जेव्हा निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोण हे तपासण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सांगितलं, तेव्हा ते कोर्टात येतात आणि निवडणूक आयोगाने पुढे जाऊ नये अशी मागणी करतात. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून दिला. यामध्ये मनाईसंबंधी आदेश नव्हता. नोटीसदेखील जारी करण्यात आली नव्हती असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे. यांना प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाकडे का यायचं आहे? अशी विचारणाही त्यांनी केली.
12:48 September 27
सदस्यांना पक्षातून काढून टाकल्याचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं का?
घटनापीठाने यावेळी या सदस्यांना पक्षातून काढून टाकल्याचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना केली. यावर कपिल सिब्बल यांनी पक्ष नाही तर पदावरुन हटवण्यात आलं असल्याचं सांगितलं. घटनापीठाने हे प्रकरणी १० व्या सूचीच्याही पलीकडे असून त्यामुळे अध्यक्ष हे ठरवू शकले नाहीत असं म्हटलं.
12:48 September 27
शिंदे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात
पुन्हा एकदा कामकाज सुरु झालं असून, शिंदे गटाचे वकील नीरज कौल करत आहेत. तीन आठवड्यांपूर्वी अल्पसंख्यांक असणाऱ्या शिवसेनेतील आमदारांनी एक बैठक घेत शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं आणि प्रतोद निवडले. त्यांच्याकडे बहुमत नसल्याने ते हे करु शकत नव्हते असा युक्तिवाद त्यांनी केला. तसंच बहुमत चाचणी कोर्टाने थांबवली नव्हती हेदेखील त्यांनी नमूद केलं.
12:23 September 27
कोर्टाचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित
घटनापीठाने काही काळासाठी विश्रांती घेतली असून तात्पुरती सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत फक्त शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद झाला असून, अद्यापही शिंदे गट तसंच निवडणूक आयोगाच्या वतीने बाजू मांडणं बाकी आहे. त्यामुळे आजची सुनावणी लांबण्याची शक्यता असून आज निकाल येणार की नाही हे पहावं लागणार आहे.
12:22 September 27
ठाकरे गटाकडून सादिक अली प्रकरणाचा दाखला
काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात केली आहे. यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणाचा दाखला दिला आहे. १९७२ मधील काँग्रेस फुटीचं हे प्रकरण आहे. त्या निकालात कोर्टाने विधीमंडळ आणि राजकीय पक्ष दोन्हींचा विचार केला होता हे ठाकरे गटाने निदर्शनास आणून दिलं.
12:08 September 27
कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे
20 जूनपासून सगळ्या गोष्टी सुरु झाल्या होत्या. 10व्या परिशिष्टानुसार फुटीची मान्यता नाही. जर पक्ष सोडला नव्हता, तर व्हीपचा पालन का केलं नाही?, असा सवाल सिब्बल यांनी मांडला आहे. 10वं परिशिष्टानुसार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. 10 व्या परिशिष्टानुसार शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. 10 व्या अनुसूची नुसार त्यांना दुसरा पर्याय नाही, असंही सिब्बल म्हणाले आहेत.
11:58 September 27
सीनियर अॅड एएम सिंघवी ठाकरे यांची बाजू मांडत आहेत

माझे सबमिशन असे आहे की कार्यवाही थेट टक्कर आणि अविभाज्यपणे एकमेकांशी जोडलेली आहे. त्या कारणास्तव, 4 ऑगस्ट, 2022 पासून तुमच्या अधिपतींनी स्पष्ट केले आहे की ECI कडून स्थगिती मागितली जाईल.
दहाव्या शेड्यूलमधील 'राजकीय पक्ष/मूळ राजकीय पक्ष' हा वाक्प्रचार खूपच अस्पष्ट आहे.
दुफळीचे स्वरूप नाही
एक आवश्यक अट आहे आणि नंतर 10 व्या शेड्यूलमध्ये एक पुरेशी अट आहे. आता हे सामान्य कारण आहे की आवश्यक अट झाली असेल, पुरेशी स्थिती नसेल, तुम्हाला वेगळे व्हावे लागेल. जेव्हा 2/3 जातो तेव्हा तो पुन्हा एक गट असतो. 100 पैकी 94 किंवा 75 गेले तर त्यांना विलीन करावे लागेल किंवा विलीनीकरण करून नवा राजकीय पक्ष तयार करावा लागेल
11:52 September 27
अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग प्रतीक्षा का करू शकत नाही का?
शिंदे गटाला अपात्र घोषित केलं जाण्याची शक्यता असून ते बहुमताच्या आधारे गट स्थापन कसा काय करु शकतात? हे घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखे आहे. न्यायालयाकडून अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग प्रतीक्षा का करू शकत नाही का? असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
11:52 September 27
सुप्रीम कोर्टात १० व्या सूचीचा उल्लेख
ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना वारंवार १० व्या सूचीचा उल्लेख केला जात आहे. शिंदे गटाकडे विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असं ते अधोरेखित करत आहेत.
11:52 September 27
निकाल आमच्या बाजूने लागला तर काय होणार? ठाकरे गटाची विचारणा
कपिल सिब्बल यांनी आज निवडणूक आय़ोगाने कार्यवाही केली आणि सर्व याचिकांचा निर्णय आमच्या बाजूने लागला तर काय होणार? अशी विचारणा खंडपीठाला केली आहे.
11:42 September 27
मुंबई पालिका निवडणुकीचा दावा शिंदे गटाने फेटाळला
मुंबई पालिका निवडणुकीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. यावर खंडपीठाने कोणत्या आधारे ही स्थगिती आहे अशी विचारणा केली. यावर शिंदे गटाच्या वकिलांनी कोणतीही स्थगिती नसल्याचं सांगितलं. महेश जेठमलानी यांनी हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असून, याच्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.
11:41 September 27
तर ते निवडणूक आयोगाकडे कसे जाणार? ठाकरे गटाकडून विचारणा
जरी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा असेल तर १९ जुलैच्या आधी पावलं उचचली तेव्हाच घ्यायचा हवा होता. पण त्यापूर्वी त्यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडले असेल तर ते निवडणूक आयोगाकडे कसे जाणार? अशी विचारणा कपिल सिब्बल यांनी केला आहे.लिका निवडणुकीला स्थगिती, ठाकरे गटाचा दावा शिंदे गटाने फेटाळला
11:41 September 27
अपात्रतेसंबधी निर्णय आधी घ्यावा लागेल - कपिल सिब्बल
आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन आपणच राजकीय पक्ष असल्याचं सांगितलं आहे. पण त्यांच्या पक्षातील सदस्यत्वासंबंधी कारवाई अद्याप प्रलंबित आहे, ज्याचा निर्णय आधी घ्यावा लागेल असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
11:36 September 27
सिब्बल यांचा युक्तिवाद
सिब्बल- पक्षाचे सदस्य स्वतंत्रपणे काम करत नाहीत
आमदार आणि राजकीय पक्ष यांच्यात नाळ जोडलेली असते
गृहीत धरा की EC ला चालू ठेवण्याची परवानगी आहे, काही निर्णय घेतला जातो, दरम्यान या कार्यवाही होतात आणि तो अपात्र ठरतो... मग काय?
अपात्रतेचा चिन्हावर कसा परिणाम होईल हा प्रश्न- जे एमआर शाह
मी त्या चिन्हावर निवडून आलो आहे....कोणतेही सरकार अशा पद्धतीने फेकले जाऊ शकते....राज्यपालांकडे जा आणि सरकार फेकून द्या.....निवडलेले सरकार पाडले असे कधी ऐकले नाही.....कुठे लोकशाही चालू आहे का.....मग काय होईल तुमचा स्वतःचा स्पीकर आहे....जो ठरवणार नाही--सिब्बल
घरात काय घडले याचा कोणताही संदर्भ न घेता.... कृपया निवडणूक आयोगाकडे जा आणि म्हणा -- सिब्बल
11:24 September 27
अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम निवडणूक चिन्हावर कसा काय होऊ शकतो? सुप्रीम कोर्टाची विचारणा
सुप्रीम कोर्टाने यावेळी अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम निवडणूक चिन्हावर कसा काय होऊ शकतो अशी विचारणा केली. यावर कपिल सिब्बल यांनी अपात्रतेचा मुद्दा फार महत्त्वाचा असून, अन्यथा अशा पद्धतीने गोष्टी होत राहिल्या तर कोणतंही सरकार पाडता येईल असा युक्तिवाद केला. त्यांच्याकडे त्यांचे अध्यक्ष आहेत जे अपात्रतेसंबंधी निर्णय घेत नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
11:23 September 27
राजकीय पक्ष म्हणजे काय?
घटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या कुठेही पहायला मिळत नाही. राजकीय पक्ष म्हणजे काय हे कुठेही नमूद नाही असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं आहे.
11:23 September 27
अध्यक्षांचे कार्यक्षेत्र आणि निवडणूक आयोगाचे अधिकार तपासावे लागतील - सुप्रीम कोर्ट
कपिल सिब्बल यांनी यावेळी जर आपण वेगळे गट आहोत असा दावा असेल, पण खऱ्या पक्षाचा भाग असाल तर तुम्ही पक्षाचं सदस्यत्व सोडलं पाहिजे असा युक्तिवाद केला. यावर सुप्रीम कोर्टाने विरोधी बाजू आपल्याकडे दीड लाख प्रतिज्ञापत्रे असून तेच मूळ गट आहेत असं दर्शवत आहे असं सांगितलं. अध्यक्षांचे कार्यक्षेत्र आणि निवडणूक आयोगाचे अधिकार तपासावे लागतील असं नमूद केलं.
11:06 September 27
निवडणूक आयोगाचं कामकाज थांबवलं जाऊ शकत नाही - सुप्रीम कोर्ट
निवडणूक आयोगाचा मुद्दा मूळ याचिकेतून उपस्थित झाला. घटनात्मक संस्था असणाऱ्या निवडणूक आयोगाचं कामकाज थांबवलं जाऊ शकत नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. दरम्यान, कपिल सिब्बल यांनी कोर्टाने आधी दाखल याचिका निकाली काढाव्यात नंतर निवडणूक आयोगासंबंधी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
11:05 September 27
एकनाथ शिंदे कोणत्या हक्काने निवडणूक आयोगाकडे गेले होते? सुप्रीम कोर्टाची विचारणा
एकनाथ शिंदे १९ जुलैला निवडणूक आयोगात गेले होते. पण त्याआधी अनेक घडामोडी पार पडल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा आधी निर्णय लागणं गरजेचं होतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. यावर निवडणूक आयोगाकडे ते पक्षाचे सदस्य म्हणून गेले होते की आमदार म्हणून गेले होते अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली. यावर कपिल सिब्बल हाच महत्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं.
10:59 September 27
कपिल सिब्बल युक्तीवाद करताना
कपिल सिब्बल युक्तीवाद करताना
जेव्हा तो निवडणूक आयोगाकडे जातो....तो कोणत्या क्षमतेने निवडणूक आयोगाकडे जातो....विधानमंडळ सदस्य किंवा पक्ष सदस्य म्हणून?-- जे डीवाय चंद्रचूड
मिस्टर सिब्बल ते फक्त विधीमंडळाचे सदस्य म्हणून फिरू शकतात - जे एम आर शाह
जर ते अपात्र ठरले तर ते विधिमंडळ सदस्य म्हणून कसे फिरणार - सिब्बल
10:56 September 27
प्रकरण सविस्तरपणे मांडा - न्यायमूर्ती चंद्रचूड
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हे प्रकरण सविस्तरपणे मांडा आणि त्यानंतर कधीपर्यंत सुनावणी घ्यायची किंवा निर्णय घ्यायचा याबद्दल निर्णय घेऊ असं सांगितलं.
10:46 September 27
लाईव्ह सुनावणीला सुरुवात
अर्जावर निर्णय झाला नसताना सुनावणी कशी पुढे जाईल अशी विचारणा कपिल सिब्बल यांनी केली आहे. यावर ज्येष्ठ वकील कौल यांनी हा अर्ज निवडणूक आयोगाला याप्रकरणी निर्णय घेण्यापासून रोखण्यासंदर्भात आहे आणि अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातील आहे असं सांगितलं.
10:42 September 27
टॅक्सी चालकाने पत्नीची केली हत्या, चेंबूरमधील खळबळजनक घटना
मुंबई : चेंबूर परिसरातील राहुल नगर येथे एका टॅक्सी चालकाने पत्नीने सोडचिट्टी मागितली म्हणून धारदार शस्त्राने तिची हत्या केली. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी टॅक्सी चालक इकबाल शेख (वय 36) याला टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून थोड्या वेळात अटक करण्यात येईल, असे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले.
10:02 September 27
राठवाड्यात पीएफआयच्या 21 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या अनेक ठिकाणावर छापेमारी सुरू केली आहे. औरंगाबादमधून 13 तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून 7 तर सोलापुरातून 1 जण ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर ठिकाणीही छापेमारी सुरू आहे.
09:47 September 27
खरी शिवसेना कोणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार सुरू
मुंबई - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.
09:30 September 27
औरंगाबादेत उपवासाची खराब भगर खाल्ल्याने 100 हून अधिक जणांना विषबाधा
औरंगाबाद (वैजापूर): सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे, अनेक जण नवरात्रात उपवास करतात.. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उपवासाची भगर खाल्ल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक जणांना विषबाधा झाली आहे. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात जवळपास शंभर जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी तेरा जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
08:51 September 27
पीएफआयच्या राज्यातील अनेक ठिकाणांवर छापेमारी, काही जणांना घेतलं ताब्यात
औरंगाबाद - राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या अनेक ठिकाणावर छापेमारी सुरू केली आहे. औरंगाबादमधून 9 तर सोलापुरातून 1 जण ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर ठिकाणीही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
08:51 September 27
शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी अडीच वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक पार पडणार असून, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पक्षातील काही जिल्हा निहाय नेमणुका आणि सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यावर राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत याबाबतीत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
08:12 September 27
नांदेड एटीएसने PFI चा फरार कार्यकर्ता मोहंमद आबेदला केली अटक
नांदेड - PFI कार्यकर्त्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. नांदेडमध्येही देगलूर नाका भागातून मेहराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने अटक केली होती. तसेच परभणीतून चार जणांना अटक केल्यानंतर नांदेड एटीएसने पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले. मुख्य न्यायाधीश कीर्ती जैन देसरडा यांनी या पाचही जणांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते. या प्रकरणाशी संबंधित असलेला व फरार झालेला नांदेडचा मोहम्मद अबेदअली महेबूबअली (वय२६ ) याला देगलूर नाका भागातून सोमवार (दि.२६) अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी नांदेड न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिली.
07:00 September 27
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाझ भाटीला मुंबईतून अटक
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाझ भाटी याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंधेरी परिसरातून अटक केली आहे. रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि पैसे उकळले होते.
06:22 September 27
खासदार नवनीत राणा यांनी धरला गरब्यावर फेर
अमरावती - खासदार नवनीत राणा यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हॉटेल ग्रँड माहेफिल आणि एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी भाविक महिला भक्तांसह गरब्यावर नृत्य करण्यासाठी फेर धरला. दोन्ही ठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी गरब्यात सहभागी सर्वांचा उत्साह द्विगुणित झाला.
06:22 September 27
बिग बॉस मराठी सिझन ४ झाला अनाऊन्स, येणार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २ ऑक्टोबर ला
मुंबई - कोरोना काळात लॉकडाऊन लागला होता तेव्हा देखील मराठी बिग बॉस प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी छोट्या पडद्यावर अवतरला होता. आता सर्वत्र आलबेल आहे आणि मोठ्या दिमाखात बिग बॉस मराठीचा सिझन ४ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थोडक्यात, मराठी मनोरंजनाचा बाप परत येतोय. यावर्षी तो परत येतोय अधिक भव्य स्वरूपात, काही नव्या सरप्राईझेसना घेऊन. तो सज्ज आहे नव्या सदस्यांसोबत, नव्या रूपात. बिग बॉसचे एक असं घर ज्याने सदस्यांचे भांडण-वाद विवाद बघितले, असं घर ज्याने नाती कशी निभवावी हे शिकवलं, जीवनाकडे कसं बघावं आणि कसं जगावं हे शिकवलं, ते घर आणि त्यातील नवीन किस्से प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
06:17 September 27
MAHARASHTRA BREAKING NEWS
मुंबई - दादर डॉ डिसिल्वा रोड वरील यश प्लाझा या व्यावसायिक इमारतीत रात्री ९.२८ वाजता आग लागली. काचेची इमारत असल्याने धूर सर्वत्र पसरला होता. अग्निशमन दलाला रात्री ११.५ वाजाता आग विझवण्यात यश आले आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.