ETV Bharat / city

Maharashtra Breaking news and live updates दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार - दानवेंचा आरोप

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news
author img

By

Published : Oct 6, 2022, 6:44 AM IST

Updated : Oct 6, 2022, 7:55 PM IST

19:53 October 06

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार - दानवेंचा आरोप

मुंबई - सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला. या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे, असे दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

19:38 October 06

गोरेगाव रेल्वे स्थानकात तरुणीचे चुंबन घेणाऱ्यास अटक

मुंबई - गोरेगाव रेल्वे स्थानकात तरुणीचे चुंबन घेणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.

18:46 October 06

पुण्यात वारकऱ्यांची पिकअप उलटली, १५ जण जखमी

पुण्यात वारकऱ्यांची पिकअप उलटली १५ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर. मदतकार्य सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

18:39 October 06

लोकलमध्ये सीटवरून झालेल्या वादानंतर महिलांची एकमेकींना मारहाण, महिला पोलीस जखमी

नवी मुंबई - सीटवरून झालेल्या वादानंतर काही महिलांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कटरे यांनी ही माहिती दिली. वाशी रेल्वे स्टेशनवर आज ठाणे ते पनवेलला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 3 महिलांची हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी माध्यमांना ही माहिती दिली.

18:10 October 06

शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंच्या सभेला आवाज सर्वाधिक - आवाज फाउंडेशनचा निष्कर्ष

मुंबई - दसरा मेळाव्याचा आवाज फाउंडेशन तर्फे अहवाल जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला आवाज सर्वाधिक होता, असा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला आहे. त्याबाबत त्यांनी अहवाल जारी केला आहे.

18:04 October 06

जिओ 5G बीटा चाचणी दिल्लीत सुरू, 1gbps पेक्षा जास्त डाउनलोड स्पीड

नवी दिल्ली - रिलायन्स जिओ 5G बीटा चाचण्या दिल्लीत सुरू झाली आहे. यावेळी चाचणीत 1gbps पेक्षा जास्त डाउनलोड स्पीड मिळत असल्याचे दिसून आले. दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये काही भागात हे स्पीड दिसून आल्याची माहिती एएन आयच्या बातमीत दिली आहे.

17:53 October 06

मोदी शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने चारलाख डॉलरची लाच देऊन कंत्राट मिळवले - राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंबई - मोदी शासनाच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलर लाच देऊन कंत्राट मिळाल्याचा आरोप केला गेलेला आहे. यामध्ये ओरॅकल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने रेल्वे मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांना ही लाच दिल्याचा हा आरोप आहे. याबाबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर घणाघात केला आहे. न खाने दूंगा न खाऊंगा, म्हणणाऱ्या मोदी शासनाने रेल्वे मंत्रालयातील चार लाख डॉलरच्या भ्रष्टाचाराची चौकशी त्वरित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

17:31 October 06

शिवसेना भवनजवळ पाण्याची पाईप फुटली, दुरुस्तीचे काम सुरू

मुंबई - दादर शिवसेना भवनजवळ आज पाईप लाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. तानसामधून पाणीपुरवठा होणाऱ्या पाइपलाईनवर एक छिद्र पडले. त्यातून पाणी वाया जात आहे. याची माहिती मिळताच पालिकेचा जलविभाग आणि जी नॉर्थ विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुपारी २ वाजता हे काम सुरू झाले. आज रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

17:25 October 06

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 80 कोटींहून अधिक किमतीचे 16 किलो हेरॉईन जप्त

मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज 80 कोटींहून अधिक किमतीचे 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. हे लपवण्यासाठी आरोपीने त्याच्या ट्रॉली बॅगमध्ये चोरकप्पा तयार केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

17:16 October 06

मुकेश अंबानी आणि कुटुंबियाना धमकी प्रकरणातील आरोपी राकेश मिश्र याला दहा दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई - मुकेश अंबानी आणि कुटुंबियाना धमकी प्रकरणातील आरोपी राकेश मिश्र याला दहा दिवसांची पोलीस कोठडी

15:25 October 06

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जवर सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे आदेश

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जवर सीबीआयला उत्तर दाखल करण्यास सत्र न्यायालयाने सांगितले आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सीबीआय 14 ऑक्टोंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

15:18 October 06

ठाणे - मुख्यमंत्री न आल्याने देवीचे विसर्जन न करणे चुकीचे, मनसेची नाराजी

ठाणे - मुख्यमंत्री न आल्याने देवीचे विसर्जन थांबवलेल्या नवरात्र उत्सव मंडळाला मनसेने इशारा दिला आहे. मुख्यमंत्री न आल्याने देवीचे विसर्जन न करणे हे चुकीचे आहे. यातून देवीची विटंबना केली जात आहे असा मनसेने आरोप केला आहे. नवरात्र उत्सवासाठी मुख्यमंत्री अनेक ठिकाणी फिरत असताना ठाण्यातील कित्येक दिवस आधी तयार असलेल्या कळवा पूल असे उद्घाटन करण्याची ह त्यांनी मागणी केली आहे.

14:46 October 06

ना माझं ना तुमचं हिंदुत्व हे एकच - प्रज्ञासिंह ठाकूर

मुंबई - हिंदुत्वच्या मुद्द्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या हिंदुत्वाची परिभाषा एकच आहे. त्या म्हणाल्या ना माझं ना तुमचं हिंदुत्व हे एकच आहे आणि सनातन आहे. माझं आणि तुमचं अशा प्रकारे वेगवेगळे हिंदुत्व असू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

14:21 October 06

अहमदाबादजवळ वंदे भारत एक्सप्रेसची म्हशींना धडक

मुंबई - अहमदाबादजवळ वंदे भारत एक्सप्रेस म्हशींना धडकली. बटवा आणि मणिनगरनगरदरम्यान हा अपघात झाला. या अपघातात वंदे भारत एक्सप्रेसचा पुढील भाग मोडला. सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान हा अपघात घडला.

14:15 October 06

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएस तपास अधिकाऱ्याची उलट तपासणी सुरू

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एटीएस तपास अधिकाऱ्याची उलट तपासणी सुरू झाली आहे. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर उलट तपासणी दरम्यान मुंबई सत्र न्यायालयातील कोर्टात हजर आहेत. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर संबंधित साक्षीची उलट तपासणी होत आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी संबंधित सुरतमध्ये कुठल्याही प्रकारचे आरटीओ कार्यालयात डॉक्युमेंट मिळाले नव्हते. तपास अधिकाऱ्यांनी उलट तपासणीत ही माहिती दिली. आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याशी संबंधित कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे एटीएस अधिकाने कोर्टासमोर सांगितले.

14:02 October 06

भांडण सोडवायला गेलेल्या इसमाची हत्या

विरार - सहकारनगरमध्ये हत्या झाली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या इसमाची हत्या करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांचा विरार पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला. विरार पूर्वेकडील सहकारनगरमध्ये गरबा आटोपून घरी जात असताना मुन्ना उर्फ बेजनाथ शर्मा याच्या मित्राचे काल रात्री एकच्या सुमारास भांडण सुरु होते. ते सोडवण्यासाठी गेलेल्या बेजनाथ शर्मावर तेथील तरुणांनी डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

13:34 October 06

थायलंडच्या ईशान्य प्रांतात झालेल्या गोळीबारात किमान 20 लोक ठार

थायलंडच्या ईशान्य प्रांतात झालेल्या गोळीबारात किमान 20 लोक ठार झालेत. रॉयटर्सने पोलिस प्रवक्त्याचा हवाला देऊन ही माहिती दिली.

12:53 October 06

तांत्रिक अडचणीमुळे भायखळाहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन रांगेत उभ्या

मुंबई - भायखळाहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन रांगेत उभ्या राहिल्या आहेत. प्रवाशांचा त्यामुळे खोळंबा झाला आहे. ओवरहेड वायरमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

12:50 October 06

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्या उंब्रजमध्ये मेळावा

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उद्या उंब्रजमध्ये आयोजित केला आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

12:29 October 06

मुंबईत छट पूजेनिमित्त रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ नाही

मुंबई - छट पूजा निमित्ताने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई महामंडळाने केला खुलासा केला आहे. छट पूजेमुळे दिल्लीतल्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ झाल्याने नागरिकांत चिंता होती. मध्य आणि पश्चिम रेल्वे मुंबई महामंडळाने याबाबत खुलासा केला आहे.

12:13 October 06

वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघात प्रकरणी इरफान अब्दुल रहीम बीलकियाला अटक

मुंबई - वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघात प्रकरणी आरोपी इरफान अब्दुल रहीम बीलकिया याला पोलिसांनी अटक केली आहे. आयपीसीच्या कलम ३०४ अर्थात निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारण या कलमाखाली ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगसाठी त्याला अटक केली आहे.

या घटनेत एकूण ५ ठार तर ८ जण जखमी झाले

12:05 October 06

मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

मुंबई - काल दिवसभरात दोनदा मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि रिलायन्स उडवून देण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली.

11:51 October 06

भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम पोलिसांच्या ताब्यात

नागपूर - भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भारत मुक्ती मोर्चा संघटनेकडून आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेराव टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदोरा भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

11:32 October 06

आयएएस पदावरील नियुक्तीला जनहित याचिकेतून आव्हान देता येईल का? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न

मीरा-भाईंदरचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या नियुक्तीच प्रकरण

मुंबई हायकोर्टाने केला याचिकर्त्याला प्रश्न

आयएएस पदावरील नियुक्तीला जनहित याचिकेतून आव्हान देता येईल का?

ढोले हे आयएएस नसतानाही पालिका आयुक्तपदी निवड कशी केली असा प्रश्न करत मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे याचिका

मात्र ही याचिका ऐकण्यास योग्य का आहे?

या बाबत सोमवारी होणाऱ्या सुनावणी दरम्यान पटवून देण्याचे याचिकाकर्त्यांना कोर्टाचा निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल आहे हायकोर्टात याचिका

मीरा-भाईंदरचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या नियुक्तीवरून राज्य सरकार अडचणी येण्याची शक्यता

10:33 October 06

वेदांता प्रकल्पावरून टक्केवारी मागितली हे सिद्ध करा-अजित पवार

वेदांता प्रकल्पावरून टक्केवारी मागितली हे सिद्ध करा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे.

09:43 October 06

24 तासात देशात आढळले 2,529 नवीन रुग्ण

गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 2,529 नवीन रुग्ण आढळले आहेत.

09:18 October 06

आम्ही कर्नाटकात सत्तेवर येणार आहोत- डी के शिवकुमार

विजयादशमीनंतर कर्नाटकात विजय होणार आहे. सोनिया गांधी कर्नाटकच्या रस्त्यावर फिरायला आल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही राज्यात सत्तेवर येणार आहोत. भाजप आपले दुकान बंद करण्याच्या मार्गावर आहे, कर्नाटक भाजपचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.

08:41 October 06

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार, विचारांचा वारसा मात्र एकनाथ शिंदेंकडे- नवनीत राणा

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील सभेवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

07:57 October 06

उत्तर कोरियाने पुन्हा डागले क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाने गुरुवारी त्याच्या पूर्वेकडील पाण्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले. उत्तर कोरियाने दोन दिवसांत जपानच्या दिशेने डागलेले हे दुसरे क्षेपणास्त्र आहे. दोन दिवसांपूर्वी पाच वर्षांत प्रथमच जपानवर मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते.

07:12 October 06

पोत्यात हातपाय बांधलेल्या महिलेचा मृतदेह सापडला, गुन्हा दाखल

मुंबईतील कुर्ला परिसरातील नाल्यात पोत्यात हातपाय बांधलेल्या महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू आहे.

07:01 October 06

डीआरडीओकडून मानवरहित, शस्त्रास्त्रयुक्त नौकांची चाचणी

डीआरडीओने डीफएक्सपो-2022 च्या आधी पुण्यात 3 दूरस्थ नियंत्रित मानवरहित, शस्त्रास्त्रयुक्त नौकांची चाचणी केली.

06:21 October 06

Maharashtra Breaking news and live updates

महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबईने ट्रॉली बॅगमध्ये बनावट पोकळीत लपवून ठेवलेले 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 16 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त केल्यानंतर केरळमधील एका व्यक्तीला विमानतळावर अटक केली. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू असल्याचे डीआरआयने म्हटले आहे.

Last Updated : Oct 6, 2022, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.