- मुंबई - मुंबई विमानतळावर एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान 50 लाखाहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोनं परदेशी महिलांकडून जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सोनं महिला आपल्या शरीरात लपवून आल्या होत्या. या महिलांना अटक करण्यात आली असन यांची चौकशी सुरू आहे.
BREAKING : मुंबई विमानतळावर एनसीबीने मोठी कारवाई; परदेशी महिलांकडून 50 लाखांचे सोने जप्त - राज्यात पावसाचा अंदाज
20:58 August 19
20:03 August 19
मुंबईत 5 बोगस डॉक्टरांना अटक
मुंबई : मुंबईतील गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील ५ बोगस डाॅक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना आणि कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रशिक्षण नसताना रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बोगस डाॅक्टरवर कारवाईचा बडगा उटलला आहे.
14:04 August 19
संगमनेरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची ग्रामस्थांनी केली सुटका
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील सुंदरबापू शिंदे यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला. भक्षाचा पाठलाग करत असताना हा बिबिट्या विहिरीत पडला होता. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या मदतीने बाहेर काढले आहे.
13:56 August 19
निवडणूक नव्हे, जनता आमच्यासाठी सर्वोच्च - देवेंद्र फडणवीस
कोरोनाची मुख्यमंत्र्यांची काळजी योग्यच आहे, त्यांनी ती काळजी घेत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही सल्ला दिला पाहिजे
आमच्या विरोधकांना धडकी भरणारच, आमच्यावर पोलीस बळाचा वापर आम्हाला नवीन नाही, संघर्ष आमच्या डीएनएमध्ये आहे
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यास रोखणे म्हणजे संकुचित विचार बुद्धी
13:46 August 19
टोमॅटो घेऊन येणाऱ्या ट्रकला अपघात
टोमॅटो घेऊन येणाऱ्या ट्रकला हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव येथे अपघात, ट्रक चालक जागीच ठार
13:40 August 19
अकोले तालुक्यात मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल होताच आई-वडिलांची आत्महत्या
मुलावर अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल केल्याने आणि त्यात आई वडिलांना सहआरोपी करण्यात आले. याबाबतची माहिती समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी मुलाच्या आई वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अकोले तालुक्यातील चिंचावने येथे घडली.
13:01 August 19
नारायण राणे यांनी घेतले बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन
शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन, शिवसैनिकांची आडकाठी नाही
32 वर्षाचा पापाचा घडा फुटणार आणि मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार -राणे
राजकीय कार्यक्रम नाही , आम्ही कोरोना नियमाचे पालन करू, त्यांनी आम्हाला शिकवू नये
मुख्यंमंत्री म्हणून उद्धव ठाकरेचे मोजकेच दिवस राहिलेत-
मुंबई महापालिकेत भाजपाची सत्ता येणारच
12:56 August 19
पालघर जिल्हा मुख्यालय लोकार्पण कार्यक्रम
पालघर जिल्हा मुख्यालय लोकार्पण कार्यक्रम. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे हे ऑनलाइन उपस्थित
12:21 August 19
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यात आरोपीची कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या
12:18 August 19
दादर शिवसेना भवन येथील सुरक्षा वाढवली
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. आज मुंबईत दाखल झाले आहेत, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून नारायण राणे आपल्या आशीर्वाद यात्रेची सुरुवात करणार आहेत. मात्र नारायण राणे यांना स्मृती फिरकू देणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरती शिवसेना भवन परिसर शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
12:17 August 19
न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला
न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते.
12:10 August 19
जेवढी पदे मला मिळाली, ती महाराष्ट्रामुळे मिळाली, महाराष्ट्रानेच मला दिल्लीचा मार्ग दाखवला - नारायण राणे
नरेंद्र मोदी च्या आशीर्वादाने मला केंद्रात मंत्री म्हणून संधी मिळाली. मी त्यांचा ऋृणी आहे. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचाही मी ऋृणी असल्याचे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.
देशाचा विकास साध्य करून देशाचा जीडीपी वाढवणे यासाठी प्रयत्न करणार, यासाठी जनतेचा आशीर्वाद कामी आहे.
जेवढी पदे मला मिळाली, ती महाराष्ट्रामुळे मिळाली, महाराष्ट्रानेच मला दिल्लीचा मार्ग दाखवला
महाराष्ट्राच्या जमिनीवरच माझा जन्म झाला आहे, या महाराष्ट्राच्या जमिनीवर सर्वसामान्याचा अधिकार आहे, जे झेपेल तेवढेच बोला, नारायण राणेंचा शिवसेनेला टोला
मुंबई महापालिकेतून तुम्हाला आता जनता कंटाळली आहे, जनता तुम्हाला पाय उतार करेल -नाराय़ण राणे
11:43 August 19
भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेस विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दाखवला झेंडा, यात्रेला सुरुवात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात आज मुंबईतून भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या यात्रेला दाखवला झेंडा,
या यात्रेत भाजपचे आशिष शेलार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे नेत्यांची उपस्थिती आहे
या यात्रेदरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेणार आहेत
दरम्यान शिवसैनिकांचा राणे यांच्या बाळासाहेबांच्या स्मारक भेटीला विरोध आहे, त्यामुळे संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
10:45 August 19
केंद्रीय मंत्री नारायण राणे थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर होणार दाखल
10:31 August 19
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना २५ हजारांचा दंड
न्यायमूर्ती चांदिवाल समितीकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना २५ हजारांचा दंड; चौकशीसाठी उपस्थित न राहिल्यानं दंडात्मक कारवाई
10:00 August 19
भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला भाजपाची नोटीस, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश
जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन होत आहे. तसेच या यात्रेच्या निमित्ताने भाजपाचे कार्यकर्ते एकत्र जमून कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नियमबाह्य गर्दीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस मुंबई पोलिसांकडून भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला बजावण्यात आली आहे.
09:48 August 19
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज मुंबईत जन आशीर्वाद यात्रा, बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचे घेतले दर्शन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज(19 ऑगस्ट)पासून सुरू होणार आहे. यावेळी ते शिवसेना प्रमुख् बाळासाहेब ठाकरे स्मारकास भेट देऊन आशीर्वाद घेणार आहेत. मात्र काही शिवसैनिकांचा यास विरोध असल्याचे समोर य़ेत आहे.
09:09 August 19
नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली..
पुण्यातील औंध परिसरात मयूर मुंडे नामक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. परंतु आता मात्र या मंदिरातील मोदींची मूर्ती इतर ठिकाणी हलवली असल्याची माहिती समोर येत आहे. रात्रीतून ही मूर्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली आहे. ही मूर्ती एका नगरसेवकाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
08:28 August 19
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार पालघर जिल्हा मुख्यालय इमारतींचा लोकार्पण सोहळा
07:16 August 19
शिक्षक खुर्शिद शेख आणि उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार
गडचिरोलीतील खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेश खोसे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे
06:54 August 19
मुलीच्या भावाने केली तरुणाची हत्या
नागपूर - शहरातील कपील नगर भागातील म्हाडा कॉलनी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादावरुन तरुणाची हत्या झाल्याची माहिती आहे. कमलेश बंडू साहारे असे मृताचे नाव आहे. आरोपी हे मुलीचे भाऊ असल्याचेही माहिती समोर येत आहे.