ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल - rain and flood updates

महाराष्ट्र अपडेट
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jul 28, 2021, 7:10 AM IST

Updated : Jul 28, 2021, 10:23 PM IST

22:22 July 28

नागपूर : गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

नागपूर - हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुमगाव परिसरात सुखदेव देवाजी वरखडे या तरुणाचा गळा आवळून खून झाला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृत सुखदेव देवाजी विरखडे हा मासेमारी करण्यासाठी सोमवारी घरून निघाला होता. त्याचा भाऊ राजकुमार विरखडे त्याला शोधत असताना आज( ता २८) वागधरा-गुमगाव च्या जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊसजवळ त्याचा मृतदेह आढळला. मृताचे दोन्ही हात दुपट्ट्याने बांधले होते. शिवाय त्याच्या गळ्याला सुद्धा दुपट्टा गुंडाळला होता तर त्याच दुपट्ट्याचा तुटलेला दुसऱ्या टोकाचा काही भाग पंप हाऊसच्या इमारतीला असलेल्या लोखंडी रेलिंगला बांधला होता.

20:52 July 28

तळीये गावातील लोकांचे पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी ६ महिन्यात करणार- अदिती तटकरे

मुंबई - महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प कायम स्वरुपी उपलब्ध व्हावा, अशी विनंती केली होती पण तो उपलब्ध झाला नाही.  राज्याचा बेस कॅम्प तरी उपलब्ध व्हावा यासाठी  आज राज्य सरकारने त्यास मंजुरी दिली आहे. तळीये गावातील लोकांचं पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी ६ महिन्यात केले जाईल, असे आश्वासन रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे. 

20:52 July 28

अभिनेत्री दीपाली सय्यद कोल्हापूर पूरग्रस्तांना करणार 10 कोटींची मदत

कोल्हापूर - मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद कोल्हापूरकरांच्या मदतीला धावली आहे.  आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी दीपाली सय्यदकडून पाहणी केली. अभिनेत्री दिपाली सय्यद  पूरग्रस्तांना १० कोटींची मदत देणार आहे. ही मदत दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे. 

18:40 July 28

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना त्रास होऊ लागल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

18:28 July 28

ईडी प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 23 ऑगस्टपर्यंत सरनाईक व कुटुंबाविरोधात कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एनएसईएल आणि टॉप्स सिक्युरिटीज प्रकरणात ED च्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांच्यासह विहंग आणि पूर्वेश या दोन्ही मुलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 

17:36 July 28

महिला वकील बलात्कार प्रकरणी सर्व आरोपी वकिलांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई - महिला वकील बलात्कार प्रकरणी सर्व आरोपी वकिलांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी वकिलांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र एक दिवस आड संध्याकाळी 6 ते रात्री 8 दरम्यान पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने आरोपींना दिले आहेत.

17:36 July 28

शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत MPSC कडे पाठवा, अजित पवारांचे निर्देश

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दिनांक ४ मे २०२१ आणि दिनांक २४ जून २०२१ च्या शासन निर्णयातून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. ही रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

16:10 July 28

शंभर कोटी वसुली प्रकरण सीबीआयकडून महाराष्ट्रात धाडसत्र सुरू, 12 ठिकाणी छापेमारी

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने राज्यात एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. पुणेच्या कोथरुडमध्ये एसीपी संजय पाटीलच्या घरी सीबीआयने रेड टाकली. एसीपी संजय पाटील मुंबई पोलीस सोशल सर्विसमध्ये असताना वाझे प्रकरण, 100 कोटी वसूली केसमध्ये त्यांचे नाव समोर आले होते. एसीपी पाटीलचे स्टेटमेंट पूर्वी सीबीआयने घेतले होते.  मुंबई पोलीस दलातील उपायुक्त राजू भुजबळ यांचे नावही समोर आले होते. राजू भुजबळ हे मुळ संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे रहिवाशी आहेत. मंगळवारी दुपारी सीबीआय पथकाने अचानक त्यांच्या घरी चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे , पुणे  आणि इतर अनेक शहरात एकूण 12 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केल्याचे समोर आले आहे. 

15:49 July 28

युवक काँग्रेसचे नागपूर मनपा मुख्यालयाबाहेर आयुक्तांविरोधात आंदोलन

नागपूर - मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नाना पटोले यांचे फोटो असलेले बॅनर काढण्याचे  आदेश दिले होते. त्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.  मनपा आयुक्त भाजपचे अनधिकृत जाहिरात प्रमुख असे लिहिलेले बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांची झटापट झाली.  

15:49 July 28

होय मी दिल्लीला गेलो होतो; पण.., झारखंड प्रकरणात बावनकुळेंची माहिती

नागपूर - झारखंड सरकार पडण्याचा डाव प्रकरणावर बावनकुळे यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.  होय मी दिल्लीला गेलो होतो, पण राजकीय कामासाठी नाही तर नवनियुक्त मंत्र्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी, असा खुलासा  चंद्रशेखर बावनकुळे यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना केला. 

15:48 July 28

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीचा करणार पाहणी

मुंबई - अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीचा  आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  यापूर्वी रत्नागिरी रायगड जिल्ह्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केलीी  होती.  मात्र खराब हवामानामुळे सातारा जिल्ह्याचा दौरा रद्द करावा लागला होता. आत्ता मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत

15:48 July 28

100 कोटी वसुली प्रकरण : सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर सीबीआयची धाड

पुणे -  100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआय ऍक्टिव्ह झाली असून याप्रकरनात मुंबई पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुण्यातील घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सीबीआयने ही धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली प्रकरणात आरोप करताना संजय पाटील यांच्या सोबत असलेले व्हॉट्सअप चॅटिंग पुरावे म्हणून जोडले होते. याच प्रकरणात ही कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.  

15:47 July 28

लातूर जिल्ह्यातील माळुंब्रा गावात एकाच वेळी कोरोनाचे 22 रुग्ण आढळल्याने खळबळ

लातूर - जिल्ह्यातील माळुंब्रा गावात एकाच वेळी कोरोनाचे 22 रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. प्रशासनाकडून माळुंब्रा गाव सील करण्याचे आदेश देण्याचे आले आहेत.

15:47 July 28

शिर्डीत साईबाबा मंदिराशेजारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

अहमदनगर - शिर्डीत साईबाबांच्या मंदिरा शेजारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ. घटनेची माहिती मिळताच..पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले.  तपासणी केली तेव्हा सत्य समोर आले की, साई मंदिर सुरक्षेचा एक भाग म्हणून हे मॉकड्रिल पोलीसांकडून करण्यात आले होते

15:00 July 28

पॉर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्राचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला न्यायालयाने  दणका दिला असून. मुंबई सत्र न्यायालयाने राज कुंद्रा यांचा जामीन  फेटाळला आहे. राज कुंद्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

14:10 July 28

भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला

14:09 July 28

नाटेकरांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली- मुख्यमंत्री

ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदूनाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. नंदू नाटेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली- मुख्यमंत्री

13:41 July 28

कोकण किनारपट्टी भागात पुढील 3 तासात पावसाचा अंदाज

मुंबई - कोकण किनारपट्टी भागातील ठाणे रायगड, पालघर आणि मुंबई उपनगरात 5 वाजपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

12:36 July 28

तुर्तास प्रताप सरनाईक यांच्यावर कठोर कारवाई नको, उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश

 मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांची मुले ईडीच्या रडावर आहेत. या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांच्यावर तुर्तास कठोर कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सरनाईक यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सरनाईक यांनी ईडीचा त्रास टाळण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाशी जुळवून घेण्याबाबतचे पत्र लिहले होते.

10:06 July 28

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा, शेकापा नेते जंयत पाटील घेणार भेट

सांगोला मतदार संघाचे 11 वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार गणपत आबा देशमुख यांची प्रकृती खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी दिली.  देशमुख यांची व्हेंटिलेटरवरून बायो पेपे मशीन द्वारे श्वासन क्रिया सुरू कऱण्यात आली असून देशमुख यांचा उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही डॉक्टर देशमुख यांनी सांगितले., दरम्यान शेकापाचे नेते जयंत पाटील हे गणपतरावांच्या तब्यतीची विचारपूस करण्यासाठी सोलापुरात दाखल झाले आहेत. ते रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतील.

09:14 July 28

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल, पुण्यातील शाखा अध्यक्ष निवडीसाठी स्वतः राज ठाकरे मुलाखत घेणार आहेत. आज पासून पुढचे तीन दिवस राज ठाकरे हे पुण्यात मुक्कामी राहणार आहेत.

09:02 July 28

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे पुणे येथे निधन

पुणे-  महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे पुणे येथे दुःखद निधन. ते ८८ वर्षांचे होते. भारताबाहेर विजेतेपद मिळवणारे ते पहिले बॅडमिंटन खेळाडू होते. त्यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत १०० पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या. त्यात १७ राष्ट्रीय विजेतेपदांचा समावेश आहे. ६ एकेरी, ६ दुहेरी, ५ मिश्र दुहेरी.

08:08 July 28

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दरेकर आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

फडणवीस पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर रवाना
फडणवीस पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर रवाना

07:57 July 28

मुंबई - अंधेरी परिसरात काल रात्री (मंगळवारी) चार मजली इमारत कोसळली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

07:02 July 28

पॉर्नग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या कंपनीतील 4 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद

मुंंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांच्या कंपनीतील आणखी 3 ते 4 प्रोड्युसर विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी आता गुरुवारी पार पडणार आहे.  

06:12 July 28

सातारा - राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Last Updated : Jul 28, 2021, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.