ETV Bharat / city

Maharashtra Breaking live Page; आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची क्लीन चिट - महाराष्ट्र ब्रिकिंग न्यूज पेज

Maharashtra Breaking live Page
Maharashtra Breaking live Page
author img

By

Published : May 27, 2022, 9:03 AM IST

Updated : May 27, 2022, 1:53 PM IST

13:47 May 27

आर्यन खान याला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून क्लीन चिट

मुंबई आर्यन खान याला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीमार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज दोषारोपपत्र सादर करण्यात आले. ६ हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. एकूण १० खंडांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे.

11:57 May 27

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही - संभाजी राजे

छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवून आपल्याशी शिसनेने गद्दरी केल्याची कबूली त्यांनी आज शुक्रवार गुरुवार (दि. 27 मे)रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली

11:52 May 27

केंद्रिय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल, केली अँजिओप्लास्टी

नारायण राणे
नारायण राणे

मुंबई - केंद्रिय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले आहेत. नियमित चेकअपसाठी ते रुग्णालयात गेल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

10:54 May 27

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये यासाठी प्रयत्न करणार, नितीन गडकरींचा वाढदिवसानिमित्त संकल्प

नागपूर - विदर्भात शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी सतत प्रयत्नरत राहीन असा संकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. वाढदिवसानिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. माझे सगळे मित्र आणि अभिष्टचिंतक यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. शुभेच्छांच्यामुळे देशासाठी सेवा करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे असेही ते म्हणाले.

10:19 May 27

परब यांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमैया

मुंबई - परब यांचे घोटाळे बाहेर काढणारच असे ठाम प्रतिपादन भाजप नेते किरीट सोमैया यांनी केले आहे. घोटाळ्याचे आणखी पुरावे देणार असल्याचे ते म्हणाले. मी काढलेल्या बारा प्रश्नांची उत्तरे परब का देत नाहीत असाही सवाल त्यांनी केला. अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असेही ते म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

09:38 May 27

यमुनोत्री मार्गावर अपघातात महाराष्ट्रातील ३ ठार

उत्तरकाशी : महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या गाडीचा यमुनोत्री महामार्गावर अपघात झाला आहे. डाबरकोटमध्ये बोलेरो कार अपघाताची शिकार झाली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. गाडीत 13 जण होते. रात्री 9.30 च्या सुमारास वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला.

08:53 May 27

Maharashtra Breaking live Page_27 May 2022

पालघर - पालघर औरंगाबाद बसचा वाघोबा घाटात अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडला आहे. चालकाने मद्यपान केले असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या अपघातामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : May 27, 2022, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.