पुणे,- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रपती महोदयांच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. यावेळी वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी, पी.पी.मल्होत्रा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनीही राष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
Maharashtra Breaking Live Updates : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत
22:12 May 26
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत
18:41 May 26
मुंबईत आज ३५० नवीन कोरोनाबाधितांची वाढ
मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) होऊन गेले काही दिवस ५० आत व नंतर १०० वर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या २०० च्या वर गेली. आज गुरूवारी त्यात आणखी वाढ होऊन ३५० नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद (deaths) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १६५८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
16:30 May 26
कराडमध्ये कॉलेजवरून घरी येताना सख्ख्या चुलत बहिणींच्या दुचाकीला कारची धडक, एकीचा मृत्यू
कराड (सातारा) - कॉलेज संपल्यानंतर घरी जात असताना चुलत बहिणींच्या अॅक्टिवाला पुणे-बंगळुरू महामार्गावर कारने धडक दिली होती. अपघातात जखमी झाल्याने दोघींना कराडमधील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना जखमीपैंकी एका बहिणीचा मृत्यू झाला. कल्याणी लोहार (रा. गोवारे, ता. कराड), असे तिचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक रियाज बालेचाँद आत्तार (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
15:24 May 26
अनिल परब गजाआड जातील, आणखी चौघांचे नंबर - किरीट सोमैया
मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर आज ईडीने छापे टाकले. लवकरच अनिल परब तुरुंगात जातील. सोबत आणखी चार नेत्यांचा आता क्रमांक लागेल, असा दावा किरीट सोमैया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
13:38 May 26
संजय राऊत यांच्या विरोधातील सोमैयांच्या मानहानी खटल्यावर ९ जूनला निर्णय
मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांच्या पत्नी मेधा सोमैया यांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल मानहानी दाव्यावर शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. आज कोर्टाने या प्रकरणात आपले आदेश 9 जूनपर्यंत राखून ठेवले आहेत. या खटल्यावर पुढील सुनावणी शिवडी कोर्टात 9 जून रोजी होणार आहे. खासदार संजय राऊत यांना या प्रकरणात कोर्टात हजर राहण्यास सांगण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमैया यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला. त्यामुळे आता मेधा सोमैया यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा केला होता.
11:46 May 26
गुरज्योत सिंह किर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई - गुरज्योत सिंह किर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही त्यामुळे तयार राहण्याचे पवार यांचे आदेश.
11:16 May 26
धुळे - चार पिस्टल, पाच मॅगझीन, पाच जिवंत काडतुसांसह हरियाणातील ३१ वर्षीय युवकाला अटक
धुळे - चार पिस्टल, पाच मॅगझीन, पाच जिवंत काडतुसांसह हरियाणातील ३१ वर्षीय युवकाला अटक. धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलिसांची दभाशी बस स्थानकाजवळ कारवाई. १ लाख ९५ हजाराचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
09:55 May 26
पुणे - अनिल परब यांच्या कोथरुड, हडपसर ,लोणावळा येथील ठिकाणांवर छापेमारी
पुणे - शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुण्यातील कोथरूड,हडपसर आणि लोणावळा या ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुण्यातील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.
08:59 May 26
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण कुलाबा पोलिसांकडे वर्ग
मुंबई - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. बीकेसी सायबर सेल पोलिसांकडून कुलाबा पोलीसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. गोपनीय अहवाल लिक प्रकरणात बीकेसी सायबर सेलकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणात सायबर सेलकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
08:50 May 26
Maharashtra Breaking Live Page_26 May 2022 अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी ईडीचा छापेमारी
मुंबई - अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित 7 ठिकाणी ईडीचा छापेमारी सुरू केली आहे. अनिल परब यांच्या संबंधित लोकांच्या निवासस्थानी देखील ईडीची छापेमारी सुरू आहे.