ETV Bharat / city

MAHARASHTRA BREAKING: विधानपरिषदेच्या 'त्या' जागा रिक्त ठेऊ नये..राज्यपाल व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय हवा - उच्च न्यायालय - शाळा सुरू करण्यास स्थगिती

MAHARASHTRA BREAKING
MAHARASHTRA BREAKING
author img

By

Published : Aug 13, 2021, 9:04 AM IST

Updated : Aug 13, 2021, 9:31 PM IST

19:39 August 13

आय.टी. कायद्यातील दुरूस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण, उद्या निकाल

मुंबई - आय.टी. कायद्यातील दुरूस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण. मुंबई उच्च न्यायालय शनिवारी संध्याकाळी तातडीने निकाल जाहीर करणार आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली. सरकारवर मीडियाकडून होणारी टीका थांबवण्यासाठीच ही सुधारणा केल्याचा याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून मात्र कायद्यातील नव्या तरतुदींचे समर्थन करण्यात येत आहे. देशातील विविध उच्च न्यायालयांत यासंदर्भात याचिका दाखल झाल्या आहेत. 

17:54 August 13

आज मार्मिकचा वर्धापन दिन सोहळा

मुंबई - आज दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी सायं. ५ वा. मार्मिकचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे  मार्गदर्शन करणार आहेत

17:54 August 13

मराठा आरक्षणासाठी यापुढे मूक नव्हे तर ठोक मोर्चा काढू; छावा संघटनेचा इशारा

जळगाव - राज्यातील मागील भाजपा व विद्यमान महविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दोघांच्या राजकाणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे आरपार की लढाई असेल. मराठा समाज मूक मोर्चा काढणार नाही तर, हातात दंडूके घेवून ठोक मोर्चा काढेल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

17:33 August 13

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्यपालांनी त्वरित पालन करावे - नाना पटोले

वर्धा - उच्च न्यायालयाचा आदेशाचे राज्यपालांनी त्वरित पालन करावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना म्हणाले, वर्षभरापासून 12 विधानपरिषद सदस्यांची यादी प्रलंबित आहे. राज्यपालांची आतापर्यंतची भूमिका या यादीबद्दल असंविधानिक होती.  राज्यपाल हे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.  

16:49 August 13

नाशिक जिल्हा परिषद लाच प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

नाशिक - नाशिक जिल्हा परिषद लाच प्रकरणी मुख्य संशयित आरोपी डॉ. वैशाली वीर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले व शिक्षक पंकज रमेश दशपुते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

16:48 August 13

लातूर : दुहेरी हत्याकांडाचा सव्वा महिन्यांनी उलगडले रहस्य, मुंबईतून जावयाला अटक

लातूर - गोटेवाडीच्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडले असून तब्बल सव्वा महिन्यानंतर किल्लारी पोलिसांना यश आले आहे. वयोवृद्ध दोन सासूंचे जावयाने कोयत्याने तुकडे केले होते. आरोपी ड्रायव्हर जावयाच्या पोलिसांनी मुंबईतून मुसक्या आवळल्या आहेत. दुहेरी हत्याकांडाने लातूर जिल्हा हादरला होता.

16:05 August 13

NCB कडून आफ्रिकन टोळी जेरबंद, एक कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई - गुरुवारी रात्री एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली. आफ्रिकन नागरिकांच्या एका टोळीला एनसीबीने अटक केली आहे. पूर्व मुंबईपासून ते नवी मुंबईपर्यंत ही टोळी अमली पदार्थ तस्करीचा धंदा करत होती. या संपूर्ण क्षेत्रामध्ये या टोळीने आपले ड्रग्जचे जाळे पसरवले होते. कारवाईदरम्यान एनसीबीचे चार अधिकारी गंभीर जखमी झाले असून एक कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.

15:45 August 13

राज्यात सुव्यवस्थेसाठी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय हवा - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीची याचिका हायकोर्टाने आज  निकाली काढली. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणमिमांसा होणं गरजेचे असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. राज्यात सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा, मात्र परिस्थिती आणि जबाबदारीचं भान ठेवत त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशाप्रकारे नामनिर्देशित जागा अनिश्चितकाळासाठी रिकाम्या ठेवता येणार नाहीत असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.  

15:45 August 13

इसिसच्या संपर्कात असलेल्या परभणीच्या 'त्या' चार तरुणांपैकी एकाला जामीन मंजूर

मुंबई - महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाने सन 2016 मध्ये दहशतवादी संघटना इसिसशी संपर्कात असलेल्या परभणीतील चार तरुणांना अटक केली होती. शाहेद खान, मोहम्मद इकबाल, मोहम्मद रईसोद्दीन, अब्बूकर अशी अटक केलेल्यांची नावे होती. त्यांना UAPA कायद्यांतर्गत अटक केली होती. त्यापैकी मोहम्मद इकबालला आज जामीन मिळाला.  1 लाखांचे बँड, 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने SIT येथे पुढील दोन महिने आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे.  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व एन. जे. जमादार यांच्या न्यायालयात आज ही सुनावणी झाली आहे.

15:32 August 13

..तर पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळणार नाही

नागपूर -  राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारकडे ४३५ कोटी आणि मनुष्यबळ मिळावा या साठी सादर केलेल्या अहवालाला अजूनही राज्य सरकारने हात लावला नसल्याचा बावनकुळे यांनी आरोप केला आहे. डिसेंबर अखेरीस ओबीसींचा इंपेरिकल डेटा तयार झाला नाही तर पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.  काँग्रेस नेते अभिजित वंजारी आणि बबनराव तायवाडे यांनी देखील राज्य सरकार ओबीसी समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे

15:32 August 13

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपीवरील गुन्हा रद्द

अमरावती - मेळघाटातील RFO दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी  आरोपी श्रीनिवास रेड्डीं विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला आहे. नागपूर हायकोर्टाने आज सुनावणी दरम्यान गुन्हा रद्द केला. धारणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती.

15:32 August 13

महिला व बालविकास विभागाच्या गलथान कारभारामुळे मेळघाटातील 49 नवजात बालकांचा मृत्यू - खासदार नवनीत राणा

अमरावती - राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या गलथान कारभारामुळे मेळघाटातील 49 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.  काळ्या यादीत असलेल्या कंत्राटदाराना कंत्राट देणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे असल्याचे राणा यांनी म्हटले आहे. याचे मंत्री यशोमती ठाकूर यांनी उत्तरे द्यावीत, माझयावर बिनबुडाचे आरोप करू नयेत. यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी लावावी अशी मागणी नवणीत राणा यांनी केली आहे.  

14:18 August 13

ISIS शी संबंधित आरोपीला हायकोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

मुंबई : ISIS शी संबंधित असल्याचा संशय असलेल्या परभणीच्या इक्बाल अहमद कबीर अहमदची एक लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याला मुंबई NIA कोर्टाच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजेरी अनिवार्य असण्यासोबतच तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने त्याला दिले आहेत.

13:37 August 13

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट

 टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह उपस्थित होते.

12:30 August 13

कुकडी पाटबंधारे विभागाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडून ३१ कोटींच्या निधीची मंजुरी - जयंत पाटील

कुकडी पाटबंधारे विभागाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडून ३१ कोटींच्या निधीची मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रलंबित कामांना वेग येणार असून परिसरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील जलसिंचन प्रकल्पांना चालना देऊन जलव्यवस्थापनासाठी जलसिंचन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

12:10 August 13

श्रीरामपुरातही होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्याल्याच्या प्रभारी प्राचार्यासह लिपीक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक - जिल्हा परिषदेच्या शिक्षणाअधिकारी वैशाली झनकर वीर यांनी 8 लाखांची लाच प्रकारण ताजे असतानाच श्रीरामपुरातही अशीच एक घटना घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील होमिओपॅथी मेडीकल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य व लिपीक महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक अधिका-यांनी रंगेहात पकडले. 

बीएचएमएस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पूर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देण्यासाठी 1 लाख 47 हजार रुपयांची मागणी केली होती. प्रभारी प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे, लिपीक भारती बापुसाहेब इथापे असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत...

09:42 August 13

माजी आमदार सुरेश भिवाजी इंगळे यांचे निधन

वाशिम-मंगरुळपीर मतदारसंघाचे माजी आमदार तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष सुरेश भिवाजी इंगळे यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री निधन.  अकोला येथील खासगी  रुग्णालयात झाले निधन.

08:51 August 13

राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागले असल्याची आठवलेंची टीका

नागपूर - संसदेच्या इहितासात कलंक लावणारा गंभीर प्रकार घडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सरकारने अनेकवेळा चर्चा करण्याचा प्रयत्न केला ते तयार नव्हते, यामुळे चर्चा करून दिली नाही हा आरोप चुकीचा आहे,

राहुल गांधीनीनी आरोप केला की भाजपा आमच्या आरएसएस संविधानला दाबण्याचा काम करत आहे यावर बोलतांना सविधानच्या आधारावर काम करत आहे, चुकीचे आरोप आहेत, नरेंद्र मोदी हे संविधानवर डोके टेकवतात, डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचा विचाराचा भारत उभा करायचा आहे, सबका साथ सबका विकास हे त्यांचे धोरण आहे, असे मतही आठवले यांनी व्यत केले.

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पार्टीचो दशा झाली आहे, विरोधीपक्ष दंगा मस्ती करायची आहे, संसदेत काम होऊ द्यायचे नाही आहे, काही लोकांना त्यांनी केवळ गदारोळ करण्यासाठी पाठवले आहे, सतत तीन दिवस वेलमध्ये सदस्य येत असले तर वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे,

काश्मीरमध्ये राहुल गांधीच्या सभेत बॉम्ब ब्लास्ट झाला, काश्मिरात बॉम्ब ब्लास्ट होत असतात, पण असे व्ह्यायला नको, सभा पंतप्रधानांची असों की राहुल गांधींची, या घटना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, आतंकवाद विरोधी कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया आठवले यांनी यावेळी दिली.

Last Updated : Aug 13, 2021, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.