ETV Bharat / city

LIVE UPDATE : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर

Maharashtra bandh live
Maharashtra bandh live
author img

By

Published : Oct 11, 2021, 12:51 AM IST

Updated : Oct 11, 2021, 8:40 PM IST

20:37 October 11

महाराष्ट्र बंद : 200 जण ताब्यात

कांदिवली पोलीस स्टेशन आणि समता नगर PS मध्ये 14 जणांविरोधात दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर 200 हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. बसेसचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात 3 एनसी (नॉन-कॉग्निझिबल गुन्हा) नोंदवण्यात आले आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलकांनी 11 बेस्ट बसेसचे नुकसान केले आहे, असे बेस्टच्या पीआरओंनी सांगितले.

15:31 October 11

वांद्रे-पूर्व खेरवाडी पश्चिम द्रुतगती मार्ग येथे रास्ता रोको

वांद्रे पूर्व विधानसभा शिवसेना-युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेधाकरिता वांद्रे पूर्व खेरवाडी पश्चिम द्रुतगती मार्ग येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले. 

12:48 October 11

अमरावती शहरात महाविकास आघाडीचा मोर्चा; बाजारपेठ बंद करण्याचे केले आवाहन

अमरावती - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली असताना अमरावती शहरात महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आव्हान केले. शहरात मोर्चा निघताच सकाळी सुरू झालेली बाजारपेठ अकरा वाजता बंद करण्यात आली.

12:43 October 11

  • महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कॉंग्रेसचा रुट मार्च
  • सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्त्वा महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आला रूट मार्च
  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करून केला केंद्र सरकारचा निषेध

12:38 October 11

लखीमपूर घटनेवर पंतप्रधानांची चुप्पी ही दुर्दैवी - छगन भुजबळ

  • महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे प्रतिक्रिया दिली. राज्यात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद आहे. अतिशय तुरळक घटना कुठे घडल्या असतील, त्याचा परिणाम होणार नाही. हा बंद शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

12:35 October 11

  • जळगावमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंदच्या आवाहनासाठी उतरले रस्त्यावर
  • शहरातील प्रमुख बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना केले बंद पाळण्याचे आवाहन
  • केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, केंद्रातील सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत नोंदवला तीव्र विरोध
  • उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाची घटना दुर्दैवी व निषेधार्थ असल्याचे सांगत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची केली मागणी

12:25 October 11

दुकानात चहा पीत असताना पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना पकडले - अतुल भातखळकर.

मुंबई - आज बंदचे पडसाद सर्वत्र संमिश्र होत असतानाच कांदिवली पूर्व येथे काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चहा पीत होते व चहा पीत असतानाच अचानकपणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अशी माहिती भाजपाच्या कार्यकर्ते यांनी  दिली, तर घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आपण स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची माहिती घेणार, असे सांगितले. तरी या सोबतच ज्या दुकानदारांना आपली दुकाने चालू करायचे असेल त्यांनी आरामात दुकानात चालू करावे, असे आवाहन आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

12:25 October 11

  • परळमध्ये शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
  • केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन
  • नरेंद्र मोदी आणि शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी

12:14 October 11

  • महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचा राजभवनाच्या दिशेने मोर्चा रवाना
  • केंद्रा सरकारने संबंधित मंत्र्यांना राजीनामा घ्यावा, भाई जगताप यांची प्रतिक्रिया
  • लखीमपूर  घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन; कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोलेची प्रतिक्रिया

12:07 October 11

कोल्हापूर महाराष्ट्र बंद अपडेट

  • कोल्हापूरात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बंदच्या पार्श्वभूमीवर बाईक रॅली
  • कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरून बाईक रॅली
  • लखमीपूर घटनेच्या निषेधार्थ शिवाजी चौकात तीव्र घोषणाबाजी
  • महिलांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
  • महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिला बंदला पाठिंबा

12:05 October 11

  • कल्याणमध्ये बंददरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यामध्ये बाचाबाची
  • राष्ट्रवादीचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप देसाईंचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा
  • कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात  तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते  कडकडीत बंदसाठी रस्त्यावर
  • चौका चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त

12:02 October 11

मुंबई : महाराष्ट्र बंद अपडेट

  • दादरमध्ये शिवसेनेचे साखळी आंदोलन
  • केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
  • काही काळासाठी वाहतूक ठप्प
  • शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली आज दादरमध्ये बंद करण्यात आला
  • आजच्या बंदमध्ये झालेले नुकसान भरपाई आघाडी सरकारकडून वसून करावी; अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया

11:01 October 11

वाशिममध्ये मोटारसायकल रॅली काढून दुकाने केली बंद

वाशिम - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज 'महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्यावतीने सुरू असलेल्या दुकाने बंद करण्यासाठी आमदार अमित झनक, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी वाशिम शहरात मोटारसायकल रॅली काढून दुकाने बंद केली व आज शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद ठेवण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अत्यावश्यक सेवामधील दवाखाने, मेडिकल वगळता सर्वच बाजारपेठ बंद सध्यातरी कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.

10:55 October 11

महाराष्ट्र बंदवर खासदार सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

  • लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी हा महाराष्ट्र बंद
  • राजकारणात आता माणूसकी संपली आहे
  • केंद्रातील मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा
  • केंद्र सरकार हे मोघलांचे सरकार
  • लखीमपूरची घटना क्रुरता आहे.
  • केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा

10:52 October 11

महाराष्ट्र बंदला जनतेचा उत्फूर्त प्रतिसाद; राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

  • People are supporting the bandh. No action has been taken against the Union minister and his son who were involved in the Lakhimpur Kheri violence. BJP is anti-farmer and wants to crush them: Maharashtra Minister & NCP leader Jayant Patil in Mumbai pic.twitter.com/Ln26OfT3Ml

    — ANI (@ANI) October 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

10:41 October 11

ठाणे महाराष्ट्र बंद अपडेट

  • शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण
  • उपमहापौरांचीही होती उपस्थिती
  • बंद यशस्वी होत नसल्याने पोलीस बंदोबस्तात बाजारपेठ केली बंद

10:37 October 11

पुणे महाराष्ट्र बंद अपडेट -

  • पीएमपीएमएल सेवा बंद प्रवाश्यांची होत आहे गैरसोय
  • रिक्षा चालकांकडून आकारला जाते आहे जादा भाडे

10:29 October 11

  • महाराष्ट्र बंद दरम्यान नागपूरच्या व्हेरायटी चौकात सर्वपक्षीय आंदोलन सुरू
  • दुकाने बद करण्यासाठी बाजरपेठेकडे वळवला मोर्चा

10:16 October 11

बंदच्या आवाहनाला पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठिंबा

  • Maharashtra: APMC market closed in Pune in support of bandh call given by Maha Vikas Aghadi over the Lakhimpur Kheri violence

    "The traders of the market had decided to observe the bandh and informed the farmers in advance," says market administrator Madhukant Garad pic.twitter.com/PC8fdpyEE8

  • पुणे - लखीमपूर खेरी हिंसाचारावर महाविकास आघाडीने दिलेल्या बंदच्या आवाहनाला पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. याची माहिती शेतकऱ्यांना आधीच देण्यात आली होती, अशी प्रतिक्रिया येथील अधिकारी मधुकंत गरड यांनी दिली.

10:03 October 11

मुंबईत महाराष्ट्र बंद चा परिणाम

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर बस उपलब्ध नाही
  • बस नसल्याने प्रवासाच्या लांबच लांब रांगा
  • महाराष्ट्र बंदमुळे मुंबईकरांचे हाल

09:50 October 11

  • दादर पश्चिमेकडील गजबजलेला परिसरात आज नोकरदार वर्गाची गर्दी वगळता सरसकट बंद
  • दुकानदारांनीही बंदला उत्स्फूर्त पाठिंबा

09:16 October 11

येवला,लासलगाव बाजार समिती बंद, सर्व लिलाव रद्द

नाशिक - उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ  महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदला पाठिंबा म्हणून येवला आणि लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली असून कोणत्याही प्रकारचे लिलाव येथे होणार नाहीत. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ या बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहे.

08:51 October 11

  • मुंबईत 8 ते 9 बेस्ट बसेसची तोडफोड
  • अनोळखी व्यक्तीकडून दगडफेक झाल्याची माहिती
  • बेस्टच्या बहुतेक बसेस डेपोमध्येच उभ्या
  • पोलिसांच्या सुरक्षेत बसेस चालवण्याचा निर्णय
  • सकाळी गर्दीच्या वेळी कमीत कमी बसेस चालवल्या जाणार

08:42 October 11

महाराष्ट्र बंद दरम्यान ठाण्यातील स्थिती

  • महाराष्ट्र बंदला ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचादेखील पाठिंबा
  • सकाळपासून ठाण्यातील परिवहन सेवा पूर्णतः बंद
  • परिवहन सेवा बंद ठेवल्यामुळे ठाण्यातील जनजीवन विस्कळित
  • सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सहन करावा लागतो आहे त्रास
  • महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीचा पाठिंबा
  • मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारा महामार्गावर जयहिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी धरला रोखले
  • भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

08:15 October 11

महाराष्ट्र बंद दरम्यान वांद्रे येथील दृष्ये

  • Maharashtra: Maha Vikas Aghadi that comprises of Congress, Shiv Sena, and NCP has called for a statewide bandh today in protest against the Lakhimpur Kheri violence that claimed the lives of 8 people including 4 farmers

    Visuals from Bandra Reclamation area in Mumbai pic.twitter.com/57yOFikZLv

08:11 October 11

  • मुंबईकरांचा बंदला प्रतिसाद
  • आज कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कमी

08:02 October 11

'महाराष्ट्र बंद'ला भाजपा, मनसेचा विरोध

मुंबई - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काही संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असताना, भाजप आणि मनसेने बंदला विरोध दर्शवला आहे. भाजप प्रणित संघटनाही या बंदमध्ये सामील होणार नाहीत.

01:20 October 11

महाराष्ट्र बंद विरोधात वकिलाची उच्च न्यायालयात धाव

मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आज (सोमवार 11 ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बेकायदेशीररित्या या बंदची हाक दिली असल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर कारवाईची मागणी वकील अटल दुबे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

00:58 October 11

कोल्हापुरात मुश्रीफ, सतेज पाटील यांचा कँडल मार्च

कोल्हापूर - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील क्रूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिंदू चौक कँडल मार्च काढून मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना कोल्हापूरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. 

00:41 October 11

LIVE UPDATE : महाराष्ट्र बंद लाईव्ह अपडेट

 मुंबई- महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या विविध संघटना सहभागी होणार आहेत. त्याचा फटका मुंबईमधील बेस्ट बस , रिक्षा, टॅक्सीने नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना बसणार आहे. मुंबईमधील काही व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे दुकानेही सांयकाळपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. 

Last Updated : Oct 11, 2021, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.