ETV Bharat / city

Assembly Winter Session : प्रथा बदलण्याचा अट्टाहास का.. 170 च्या बहुमतावर सरकारला विश्वास नाही का? फडणवीस यांचा सवाल - फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता ( Maharashtra Assembly Speaker election) सरकारने दहा दिवसांचा कालावधी कमी करत एक दिवसावर आणला आहे, सरकारला नेमकी कसली भीती वाटते आहे असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. (Assembly Winter Session ) त्यांचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल करीत गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्याची मागणी त्यांनी (Devendra Fadanvis in Maharashtra Assembly Winter Session 2021) केली आहे.

-winter-session-bjp-devendra-fadanvis
-winter-session-bjp-devendra-fadanvis
author img

By

Published : Dec 22, 2021, 6:53 PM IST

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ( Maharashtra Assembly Speaker election) सरकारने आज सभागृहात नवीन प्रस्ताव मांडला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव मांडला तर त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दहा दिवसांचा कालावधी कमी करत एक दिवसावर आणण्यात आला आहे. तसेच गुप्त मतदान पद्धतीने मतदान न घेता आवाजी मतदानाने निवडणूक करावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.(Assembly Winter Session ) सरकारला नेमकी कशाची भीती वाटते आहे. असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis in Maharashtra Assembly Winter Session 2021) यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं होणार असून माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला.

  • ज्या सरकारकडे 170चे बहुमत सांगितले जाते,त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमातावर विश्वास का नाही❓
    नियम बदलविले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही#MaharashtraAssembly pic.twitter.com/HhF3GHZAc1

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फडणवीस म्हणाले की, गेल्या सात वर्षांमध्ये गुढी बाजार झाला नाही, मग आताच सरकारला का भीती वाटते आहे. त्यांचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल करीत गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली

“महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही. स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिले नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टाहास का? तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू,” असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.

विजेच्या बाबतीत सरकारने फसवणूक केली - फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांना वीजदरात सवलत आणि वीज बिले माफ करण्यासंदर्भात सरकारकडे आता पैसे नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज सभागृहात सांगितले. मात्र या संदर्भात आपण सातत्याने पाठपुरावा करू आणि सरकारला शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यासाठी भाग पाडू, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

आपत्ती निवारण निधीतही सरकारने शेतकऱ्यांना फसवले -

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आपत्ती निधी पॅकेज हे फसवे असून ते सर्वांसाठी पॅकेज होते असे आता सरकार म्हणत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तुटपुंजी मदत सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. याचाही आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.