ETV Bharat / city

Maharashtra Assembly Winter Session 2021 : आजपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन; 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता - Winter Session Live Updates Maharashtra

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) होत आहे. हे अधिवेशन वादळी राहण्याच्या शक्यता आहे. एकीकडे राज्यातील एसटी कर्मचारी संप ( ST Worker Strike ), विविध परिक्षांतील चव्हाट्यावर आलेला गैरव्यवहार ( Exam Scam ), शेतकऱ्यांच्या विजबिलांचा मुद्दा तसेच स्थगित ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) यासह विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानसभा
author img

By

Published : Dec 22, 2021, 10:00 AM IST

Updated : Dec 22, 2021, 12:44 PM IST

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) होत आहे. हे अधिवेशन वादळी राहण्याच्या शक्यता आहे. एकीकडे राज्यातील एसटी कर्मचारी संप ( ST Worker Strike ) , विविध परिक्षांतील चव्हाट्यावर आलेला गैरव्यवहार ( Exam Scam ) , शेतकऱ्यांच्या विजबिलांचा मुद्दा तसेच स्थगित ओबीसी आरक्षणाच्या ( OBC Reservation ) मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर सरकारकडूनही बारा आमदारांची नियुक्ती आणि कर्नाटकातील घटनेवरून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

असे असे दिवसभराचे कामकाज -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून दिवसभराचे कामकाज जाहीर करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता विधानसभा, तर १२ वाजता परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. सुरुवातीला नविन सदस्यांचा परिचय करून देण्यात येईल. त्यानंतर प्रश्नोत्तरे, पाच खात्यातील अध्यादेश आणि कागदपत्रे पटलावर ठेवली जाणार आहेत. सन २०२१- २२ वर्षातील पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. नियम समितीचा अंतरिम अहवाल, चार लक्षवेधी, तालिका अध्यक्षांची नामनिर्देशने, शासकीय विधेयक आणि शेवटी शोक प्रस्ताव मांडून कामकाज स्थगित केले जाणार असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी कामकाज पत्रिकेत नमूद केले आहे.

हेही वाचा - 30 वर्षांच्या कार्यकाळात सातत्याने बहिष्कार घालणारे विरोधक पहिल्यांदा पाहिले - उपमुख्यमंत्री अजित पवार

Last Updated : Dec 22, 2021, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.