मुंबई - मागील १० वर्षांपासून या मतदारसंघात अनेक विकासाचे प्रश्न रखडले होते. त्या प्रश्नासाठी कोणीतरी नवीन चेहरा आणि बदल लोकांना हवा होता. म्हणूनच लोकांनी मला निवडले आहे, अशी प्रतिक्रीया वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार झिशान सिद्दिकी यांनी ईटिव्ही भारतसोबत बोलताना दिली आहे.
हेही वाचा... महाराष्ट्रात शरद पवारच ठरले ‘तेल लावलेले पैलवान’
माझा हा विजय येथील तरुणांचा आहे. त्यांनीच यासाठीचे परिश्रम घेतले आणि त्यातून माझा विजय झाला. खरे तर नवीन चेहरा आणि बदल येथील तरुणांना अपेक्षित होता. तो माझ्या रूपाने या मतदारसंघाला मिळालेला आहे. मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. विकासाचे प्रश्न सुटत नव्हते आणि त्यामुळे लोकांनी मला निवडले. लोकांनी मला जी जबाबदारी दिली, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचेही सिद्दिकी यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा... शहरी मतदारांनी 'सेना-भाजप'ला तारले?
मला तरुणांसाठी खूप काही करायचे आहे. त्यामुळे तरुणांनी समोर यावे, आपले प्रश्न मांडावेत असे मी आवाहन करतो. मी लहानपणापासून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांना समजून घेतोय. त्यांच्याकडून शिकून घेतोय. माझ्या विजयाचा सर्वात जास्त आनंद त्यांना झालेला आहे. मला खरे तर फार शिकण्याची गरज पडेल असे वाटत नाही. कारण लहानपणापासूनच मला घरातच धडे मिळत आहेत. घरातच माझ्याकडे शिक्षक असल्यामुळे मला खूप सारे मार्गदर्शन मिळत राहील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.