मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी एकूण 288 आमदारांपैकी 285 आमदारांनी मतदान (285 MLA Voting for Rajya Sabha Election 2022) केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हे सर्व मतदान पार (Rajya Sabha Election Voting) पडले. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात (Rajya Sabha Election Counting) होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांना न्यायालयीन कोठडीत असल्याकारणाने उच्च न्यायालयाने मतदान करता येणार नाही असा निर्णय दिला. त्यामुळे या दोन आमदारांना यावेळी मतदान करता आले नाही. तसेच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते, त्यामुळे हे तीन जणांचे मतदान वगळता 285 आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
मतदान वेळी चार आमदारांवर आक्षेप - मतदान करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तसेच आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भारतीय जनता पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला होता. मतदान केल्यानंतर त्यांनी आपली मतपत्रिका पक्षाचे निवडणूक निरीक्षकांच्या हातात दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे या तिन्ही आमदारांचे मतदान बाद करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही मतदान पत्रिका भाजपाचे निवडणूक निरीक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात दिली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. त्यामुळे पूर्ण मतदान प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या तीन आमदारांवर तर महाविकास आघाडीकडून भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडीला चारही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास - महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या मतांचा कोटा 42 वरून 44 वर केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या उमेदवाराला 42 मत दिली असल्याचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.
हेही वाचा - Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या 16 जागांवर चार राज्यात मतदान होत आहे; 'असे' आहे राजकीय समीकरण