मुंबई - कोरोनामुळे अनेक परप्रांतीय कामगार राज्यात अडकून पडले होते. त्यामुळे त्यांची प्रचंड उपासमार होत होती. मात्र सरकराने या कामगारांना सोडण्यासाठी रेल्वे सुरू केल्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. त्यातच आता सरकारने 200 विशेष महानगरी एक्सप्रेस सोडण्याचे जाहीर केले. त्यातील पहिली रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्नस येथून रवाना करण्यात आली.
ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्नसवरुन वाराणसी येथे पोहोचणार आहे. रेल्वेला आज रवाना करण्यात आल्याने अडकून पडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.