ETV Bharat / city

Madhav Bhandari PC : 'राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा', माधव भंडारींची मागणी

author img

By

Published : Mar 28, 2022, 6:26 PM IST

राज्य सरकारच्या 'सीएनजी' वरील मूल्यवर्धित ( CNG VAT Decrease ) कर १० टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील ( Madhav Bhandari Demand To Decrease VAT On Petrol Disel ) 'व्हॅट' ही कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे.

Madhav Bhandari PC
Madhav Bhandari PC

मुंबई - राज्य सरकारच्या 'सीएनजी' वरील मूल्यवर्धित ( CNG VAT Decrease ) कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील ( Madhav Bhandari Demand To Decrease VAT On Petrol Disel ) 'व्हॅट' ही कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले माधव भंडारी - महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे, हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे. मात्र, या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असल्याचे माधव भंडारी म्हणाले.

'सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा' - केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २१ रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ व १० रुपयांची कपात केली. त्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांसह एकूण २५ राज्य सरकारांनी पेट्रोल-डीझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्राने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट अजूनही कमी केलेला नाही. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासही महाराष्ट्राने विरोध केला आहे. आता तरी आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा, असे भंडारी यांनी नमूद केले.

हेही वाचा - IPS Ramya Rides Bicycle In Midnight : मध्यरात्री 9 किमी साईकल चालवून महिला आयपीएसकडून तपासणी; सर्व स्तरातून कौतूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.