मुंबई - राज्यात तिसरी लाट आटोक्यात ( Corona Thired Wave Under Control ) येत असून रुग्ण संख्या कमालीची घट होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 11 हजार ( Today Corona Patient Number ) रुग्णांची नोंद, तर 68 जणांचा मृत्यू ( Today Corona Patient Death ) झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 21 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. सक्रिय रुग्ण देखील 1 लाख 33 हजार ( Active Corona Patient In Maharashtra ) इतके आहेत. तर ओमयक्रोनचा एकही ( Todays Omicron Patient ) रुग्ण सापडला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
जानेवारी महिन्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात येत आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज 11 हजार 294 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यापैकी 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.83 टक्के इतका स्थिर स्थावर आहे. 21 हजार 677 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 75 लाख 13 हजार 436 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण यामुळे 96.40 टक्के इतके आहे. 7 कोटी 53 लाख 10 हजार 43 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.34 टक्के इतके म्हणजेच 77 लाख 94 हजार 34 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 95 हजार 422 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2447 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 1 लाख 33 हजार 655 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचा दिलासा
राज्यात ओमायक्रोनचा गेल्या दोन दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. राज्याला हा दिलासा असून आजपर्यंत 3 हजार 334 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 2013 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 7014 जणांची जनुकीय चाचणी केली. 6855 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 159 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
- मुंबई महापालिका - 643
- ठाणे - 57
- ठाणे मनपा - 151
- नवी मुंबई पालिका - 119
- कल्याण डोबिवली पालिका - 52
- मीरा भाईंदर - 36
- वसई विरार पालिका - 30
- नाशिक - 317
- नाशिक पालिका - 290
- अहमदनगर - 692
- अहमदनगर पालिका - 196
- पुणे - 664
- पुणे पालिका - 1494
- पिंपरी चिंचवड पालिका - 778
- सातारा - 393
- नागपूर मनपा - 764
हेही वाचा - Mumbai Traffic Jam : अमृता फडणवीसांचा दावा, 'ट्राफिक जॅममुळे मुंबईत घटस्फोट', प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच..