मुंबई - मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी देशाची दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी सणासुदीच्या काळात, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून तेजस ट्रेनच्या प्रवाशांसाठी आकर्षक प्रवास ऑफरची योजना आखली आहे. त्यानुसार प्रवाशांना सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे.
काय आहे योजना -
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले की, तेजस एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सणासुदीच्या निमित्ताने आम्ही अनेक आकर्षित योजना आखत असतो. नुकताच आम्ही या रक्षाबंधन सणाच्यानिमित्ताने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून महिला प्रवाशांना 5 टक्के विशेष कॅशबॅक ऑफर दिली होती. आता उत्सवी सणाच्या निमित्ताने पुढे, या वेळी आयआरसीटीसीने तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना 27 ऑगस्ट 2021 ते 6 सप्टेंबर 2021 दरम्यानच्या प्रवासासाठी लकी ड्रॉ द्वारे आश्चर्यकारक भेटवस्तू देण्यात येईल. दोन्ही श्रेणीतील प्रवासी, एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार आणि एसी चेअर कार ट्रेनमध्ये प्रवास करताना या लकी ड्रॉमध्ये काढलेल्या पीएनआरवर एक सरप्राईज गिफ्ट दिले जाणार आहे.
पूर्वी कॅशबॅक ऑफर आता लकी ड्रॉ -
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मार्गावरील प्रवाशांचे या तेजस एक्सप्रेस ट्रेनमध्ये या सणासुदीच्या फायद्यांसह तसेच प्रवाशांचे वाढदिवस/विशेष सणांचे साजरा करण्याची रीति आता नियमित झाली आहे. पूर्वी कॅशबॅक ऑफर आणि आता लकी ड्रॉ द्वारे सरप्राईज गिफ्टची तयारी ही केली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आत सर्व आरोग्य आणि कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून कंपनीने 7 ऑगस्ट 2021 पासून तेजस एक्सप्रेस ट्रेनचे ऑपरेशन पुन्हा सुरू केले.
हेही वाचा - मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण