ETV Bharat / city

रेल्वेचे हॉटेल स्वस्त आणि मस्त; कमी पैशात डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम प्रवाशांसाठी उपलब्ध! - railway retiring room rate

देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर(Railway Station) रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम(Retiring and Dormitory Room) तयार केल्या आहेत. जिथे काही तांसाठी किंवा एक दोन दिवसांसाठी रेल्वे प्रवासी थांबू शकतात. या डोरमेटरी आणि रिटायरिंग रूममध्ये सिंगल, डबल क्षमतांच्या आधारावर प्रवाशांना रूम मिळतात. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी डोरमेटरी आणि रिटायरिंग रुमही एसी आणि नॉन एसी कॅटेगिरीत उपलब्ध आहेत.

dormitory and retiring room
रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम
author img

By

Published : Nov 19, 2021, 6:26 PM IST

Updated : Nov 19, 2021, 7:14 PM IST

मुंबई - लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना विश्रांती घेणाऱ्यासाठी रेल्वे स्थानकांवर(Railway Station) अत्याधुनिक असे रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम(Retiring and Dormitory Room) आहेत. ज्यात प्रवाशांना अत्यंत मुबलक दरात विश्रांती घेता येते. मात्र, सध्या कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेच्या डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम बंद असल्याने नागरिकांना स्थानकाबाहेर असलेल्या खासगी हॉटेल आणि लॉजकडे धाव घ्यावी लागत आहे. सध्या बंद असलेल्या रेल्वेच्या डोरमेटरी रूमबाबत घेतलेला हा आढावा...

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
  • काय आहे रिटायरिंग-डोरमेटरी रूम?

देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम तयार केल्या आहेत. जिथे काही तांसाठी किंवा एक दोन दिवसांसाठी रेल्वे प्रवासी थांबू शकतात. या डोरमेटरी आणि रिटायरिंग रूममध्ये सिंगल, डबल क्षमतांच्या आधारावर प्रवाशांना रूम मिळतात. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी डोरमेटरी आणि रिटायरिंग रुमही एसी आणि नॉन एसी कॅटेगिरीत उपलब्ध आहेत. प्रवासी आपल्या सुविधांनुसार या रेल्वेच्या रूमचा फायदा घेऊ शकतात. प्रत्येक रेल्वे स्थानकांवरील असलेल्या डोरमेटरी आणि रिटायरिंग रूमचे दर वेगवेगळे असतात.

dormitory and retiring room
रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम
  • किती वेळेसाठी करू शकता तुम्ही बुकींग? -

या डोरमेटरी आणि रिटायरिंग रुमचे(Railway Retiring Room Booking) बुकिंग कमीतकमी ३ तासाठी आणि जास्तीतजास्त ४८ तासांसाठी बुकिंग करू शकता. विशेष म्हणजे डोरमेटरी आणि रिटायरिंगचे नियम रेल्वे स्थानकांच्या नियमांनुसार बदल करण्यात येऊ शकतात. यामध्ये वातानुकूलित डिलक्स, वातानुकूलित आणि सामान्य रूम बुकिंग करू शकता. रिटायरिंग रूमचे नियम प्रवाशांच्या संख्यावर बनवण्यात आले आहे. जर एक प्रवासी असेल तर तो सिंगल बेडरूम बुकिंग करू शकतो. दोन प्रवासी असतील तर, एक बेड रूममध्ये डबल बेड घेऊ शकतात.

dormitory and retiring room
रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम
  • असे आहेत रिटायरिंग डोरमेटरी रूमचे दर -

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असलेल्या रिटायरिंग रुमचे दर डोरमेटरी रूमपेक्षा जास्त आहेत. १२ तासांसाठी वातानुकूलित डिलक्स रिटायरिंग रूममध्ये दोन बेडचे दर ८०० रुपये, तर २४ तासांसाठी १६०० रुपये दर आहेत. तर नॉन एसी रिटायरिंग रूमसाठी १२ तासांसाठी १ हजार आणि २४ तासांसाठी २ हजार रुपये घेतले जातात. मात्र, नॉन एसी रुम बेडची संख्या जास्त असते. तर जनरल डोरमेटरी रूमचे दर कमी आहेत. सीएसएमटी स्थानकांवर पुरुष आणि महिलांसाठी जनरल वातानुकूलित डोरमेटरी वेगवेगळी आहेत. मात्र, दर दोन्ही डोरमेटरीचे एकच आहेत. जनरल डोरमेटरी रूमची एकूण क्षमता ७४ बेडची असून १२ तासांकरिता प्रति बेडसाठी १५० आणि २४ तासांकरिता २५० रुपये दर प्रवाशांकडून आकारण्यात येतो.

Fdormitory and retiring room
रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम
  • दीड वर्षांपासून रेल्वेचा डोरमेटरी रूम बंद -

एकीकडे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात परदेशाप्रमाणे पॉड हॉटेलची सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेचे स्वतःचे असलेले डोरमेटरी रूम सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहेत. यामुळे आज सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या हॉटेल आणि लॉजसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. सध्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात परदेशाप्रमाणे पॉड हॉटेलची सुरुवात केली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडणारी नाही. यामुळे रेल्वेने आपले लवकरातलवकर डोरमेटरी रूम सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

dormitory and retiring room
रेल्वेचे डोरमेटरी आणि रिटायरिंग रूम
  • पॉड हॉटेलचे दर कमी करा - हर्षा शहा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोर्रेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद याठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृह आहेत. आयआरसीटीसीच्यावतीने मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी या स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृह उभारण्यासाठी योजना आखण्यात आली होती. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया २०१९मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही सुविधा सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई सेंट्रल येथे अत्याधुनिक रेल्वेचे विश्रामगृह सुरू झाले नाही. उलट याऐवजी जपानच्या धर्तीवर पॉड हॉटेल सुरू झाले आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना परवडणार असे पॉड हॉटेलचे दर नाहीत. यामुळे रेल्वेने हे दर कमी करावेत अशी मागणी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.

Last Updated : Nov 19, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.