ETV Bharat / city

Sham Mother Film Actor : चित्रपटात 'हिरो' बनायचंय? दिग्दर्शक डहाके शोधतायेत 'श्यामची आई'साठी अभिनेता - (Sane Guruji's novel Shamchi Mother)

प्रत्येकाला कधी ना कधी अभिनेता किंवा अभिनेत्री व्हाव वसं वाटत असते. अशी इच्छा असणाऱ्यांतील काहींना सुवर्णसंधी मिळणार आहे अस दिसतय. (Shamchi Mother movie 2021) 'श्यामची आई' चे दिग्दर्शक त्यातील प्रमुख भूमिकेसाठी राज्य पातळीवर शोध घेत आहेत. संपर्कासाठी इच्छुक मुले व पालकांनी (shyamchiaai2022@gmail.com) आणि (८७७९६२४८२२) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

फोटो
फोटो
author img

By

Published : Dec 20, 2021, 9:08 AM IST

मुंबई - प्रत्येकाला कधी ना कधी अभिनेता किंवा अभिनेत्री व्हाव वसं वाटत असते. अशी इच्छा असणाऱ्यांतील काहींना सुवर्णसंधी मिळणार आहे अस दिसतय. 'श्यामची आई' चा दिग्दर्शक त्यातील प्रमुख भूमिकेसाठी राज्य पातळीवर शोध घेतोय. काही गोष्टी, तसेच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा खजिना असतो. (Sham Mother Film Actor) 'श्यामची आई' ही कथाही यांपैकीच एक आहे. त्यामुळे जेव्हा कधी 'श्यामची आई'चा उल्लेख होतो. तेव्हा क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. (Shamchi Mother movie 2021) 'शाळा'सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करत मराठी रसिकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणारा दिग्दर्शक सुजय डहाकेनं आता 'श्यामची आई' बनवीत आहे.

भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५० व्या जयंती

'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एकापेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणाऱ्या सुजयनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं १५ ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाची घोषणा केली. 'श्यामची आई' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने (Sane Guruji's novel Shamchi Mother) गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचे वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५० व्या जयंतीचे आहे. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेला 'श्यामची आई' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा शोध सुरू आहे

लवकरच 'श्यामची आई' या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या याचीच पूर्वतयारी सुरू असून, सुजय सध्या श्यामचा शोध घेण्यात बिझी आहे. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेल्या 'श्यामची आई' साठी श्यामचा शोध घेण्यासाठी सुजयनं एक शोध मोहिम सुरू केली आहे. श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आले आहे. 'श्यामची आई' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अभिनयाची आवड असलेल्या ८ ते १२ वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक असणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल

यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर श्याम साकारण्यास इच्छुक असलेला मुलगा ८ ते १२ वर्षे वयोगटातील असावा. त्याने स्वतःच एखादा मोनोलॉग मोबाईलवर रेकॉर्ड करून दिलेल्या फोननंबर आणि ईमेलवर पाठवावा. कोणीही थेट फोन करू नये. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख (३० डिसेंबर २०२१)आहे. या तारखेनंतर फोन आणि ईमेल बंद करण्यात येतील. यातून एकूण १० मुलांची निवड केली जाईल. त्यांना मुंबईत आणून, तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या मुलांना सुजय आणि त्याच्या टीमकडून संपर्क साधला जाईल असंही सांगण्यात आले आहे. इच्छुक मुले व पालकांनी (shyamchiaai2022@gmail.com) आणि (८७७९६२४८२२) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा - कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्यास कठोर कारवाई होणार - पोलीस महासंचालकांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.