- माझ्या कुटुंबीयांची काळजी तुम्ही करू नका, शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर
कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाबाबत चिंता करू नये, माझ्यावर माझ्या आईचे संस्कार झाले आहेत, असा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातले उमेदवार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवारांनी वर्धा येथील पहिल्याच सभेत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
- 'आमची मापे अन् कुंडल्या ठेवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, अपने पास भी सबकी कुंडली है'
सातारा - आमची मापे व कुंडल्या ठेवणाऱ्यांनीही लक्षात ठेवावे, की 'अपने पास भी सबकी कुंडली है', अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे यांच्या कॉलर उडवण्यावरून नरेंद्र पाटील यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
- आम्ही दगा देणार नाही, आम्हाला दगा देऊ नका; उद्धव ठाकरेंचे भाजपला आवाहन
मुंबई - युती टिकवायची असेल तर प्रामाणिकपणाची आवश्यकता आहे. आम्ही युतीत दगा देणार नाही. तुम्हीही आम्हाला दगा देऊ नका, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी भाजपकडून व्यक्त केली. शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आता समज - गैरसमज दूर केले नाहीत तर दोघांचे नुकसान होईल. दैव देते आणि कर्म नेते अशी आपली अवस्था होईल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला युतीधर्म जपण्याचे आवाहन केले. वाचा सविस्तर
- मुख्यमंत्र्यांनी मला भाजपात येण्यासाठी ऑफर देऊ केली - यशोमती ठाकूर
अमरावती - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून, तुम्हाला एवढे-एवढे देतो भाजपात या, अशी ऑफर दिली होती. मात्र, ती ऑफर आपण नाकारली', असा गौप्यस्फोट अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला. वाचा सविस्तर
- घोटाळ्यांमध्ये कारकीर्द घालवणाऱ्यांनी मला गोष्टी शिकवू नयेत - विनायक राऊत
रत्नागिरी - आपली वाटचाल घोटाळ्यामध्ये घालवणाऱ्यांनी मला गोष्टी शिकवू नयेत, 'खंबाटा एम्प्लॉइज क्रेडिट सोसायटी' ही कोणाच्या ताब्यात होती, करारावर किती संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या होत्या. हे आधी आपल्या बंधूना विचारावे, असा टोला लगावत खंबाटा प्रकरणावरून निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते आज रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
- संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नसते, आमदार पुत्राची जीभ घसरली
नागपूर - स्मृती इराणींना माहित नाही, संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही. असे वादग्रस्त वक्तव्यविधानपरिषदेचे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र जयदीप कवाडे यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य नागपूरमधीलकाँग्रेसच्या प्रचारादरम्यान केले आहे. या वक्तव्यामुळे कवाडे यांच्यावर टीका होत आहे. वाचा सविस्तर