मुंबई - सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या आठवड्यात जवळपास 15 जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. या 15 जिल्ह्यांमधून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र मुंबईत सावध पवित्रा म्हणून अजूनही तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध मुंबईसाठी लावण्यात आले आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी होत असला तरी जोपर्यंत मुंबई पहिल्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईची लोकल सेवा सुरू केली जाणार नसल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मुंबईकरांची काळजी असल्याकारणाने अद्याप लोकल सेवा सुरु करता येणार नाही असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.
..तरच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरू करणार, विजय वडेट्टीवार यांचे संकेत - मुंबई पॉझिटिव्हिटी रेट
मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी होत असला तरी जोपर्यंत मुंबई पहिल्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईची लोकल सेवा सुरू केली जाणार नसल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.