मुंबई- विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे जाणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. आणि बाहेर पडून मुख्यमंत्री पद मिळवले. त्यावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी जर मुख्यमंत्रीपद त्यांना हवे होते हे आधीच सांगितले असते तर, त्यांना नक्कीच मुख्यमंत्री केले असते. असे सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
राहुल नार्वेकर यांना अभिनंदन - विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विजयी उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar new assembly speaker) यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन ठराव मांडाताना नार्वेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा त्यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मांडत त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर टोलेबाजी करत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार
हेही वाचा-Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार
शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व भाजपसाठी ३ जुलैला विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा पहिला पेपर होता. तो पेपर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये व्यवस्थितपणे पार पडला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे आज विराजमान झाले आहेत. परंतु, आता दुसरी महत्त्वाची लढाई उद्या ( 4 जुलै ) बाकी असून, विश्वास दर्शक ठरावाला शिंदे-फडणवीस सरकारला सामोरे जायचं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
'आम्ही बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकू' - देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १६४ आमदार आमच्या बाजूने होते. आमचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे दोन आमदार आजारी असल्याकारणाने ते आज अनुपस्थित राहिले. आमच्याकडे १६६ आमदारांचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या विश्वास मताचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव आम्ही बहुमताने पारित करू, असा विश्वास उपमुख्यत्र्यांनी व्यक्त केला ( Devendra Fadnavis On Vidhan Sabha Floor Test ) आहे.
Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षपदाचा पेपर सोप्पा, बहुमत चाचणीचं काय?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 जुलैला झाली. या निवडणुकीत भाजप व शिवसेना बंडखोरांचे उमेदवार राहुल नार्वेकर निवडून ( Rahul Narwekar Assembly Speaker ) आले. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी अभिनंदानाचे भाषण केले. यावेळी राज्यपालांना विरोधी पक्षाकडून चांगलेच टोले लगावण्यात आलं. महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे पाठवण्यात आली होती. ती बारा जणांची नियुक्ती राज्यपालांनी करावी. त्यातून राज्यपालांचा एक सकारात्मक संदेश राज्यात जाईल, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ( Jayant Patil Taunt Bhagatsingh Koshyari In Vidhan Sabha ) काढला.
जयंत पाटील म्हणाले की, गेले दीड वर्ष महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करत होतं. आम्हाला माहीत नाही ते कशाची वाट पाहत होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर लगेच त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी परवानगी दिली. कदाचित ते सत्तापालट होण्याची वाट पाहत होते का?, असा टोलाही पाटील यांनी राज्यपालांना लगावला आहे.
हेही वाचा-Jayant Patil : 'कदाचीत ते सत्तापालट होण्याची वाट...'; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला