नागपूर - जिल्ह्यात रुग्णवाढ होत असताना शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी मोहीम राबवली जात आहे. यात 'सुपर स्प्रेडर'मुळे मोठ्या इमारतीत रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आल्याने विशेष मोहीम राबवत रुग्ण आढळणाऱ्या इमारतीत चाचण्या करून घेण्यात आल्या आहेत. यासोबत सध्या इमारती सील नसल्याची माहिती मनपाकडून पुढे येत आहे.
या इमारतीत सुपर स्प्रेडरमध्ये पेपर विक्रेता, भाजीपाला दूध विक्रेता यांना इमारतीत जाण्यास आता सोसायटीच्या वतीने बंदी करण्यात आली आहे. पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारती बंद केल्या जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यात एखाद्या घरात रुग्ण आढळल्यास त्यांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. यासोबत मनपाकडून गृहभेटी घेऊन विलगीकरनाच्या नियमांचे पालन होत आहे की, नाही याकडे जातीने लक्ष दिले जात आहे. यामुळे कडक निर्बध इमारती किंवा अपार्टमेंटमध्ये लावण्यात येत आहेत.