मुंबई - दक्षिण मुंबईमधील मेट्रो सिनेमा जवळील हॉटेल फॉर्च्युनला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्याला लेव्हल २ची आग लागल्याचे समजत आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे हॉटेल चारमजली आहे. याठिकाणी पाच फायर इंजिन आणि चार पाण्याचे टँक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, वरच्या मजल्यावरुन पाच व्यक्तींना वाचवण्यात अग्नीशमन दलाला यश आल्याचे समजत आहे.