IND vs SA: आजपासून पहिली कसोटी, विराट सेनेला तीन सामन्यांच्या मालिकेत इतिहास रचण्याची संधी
मुंबई - दक्षिण आफ्रिकेत रविवारपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याबरोबरच भारतीय कर्णधार विराट कोहलीसमोर प्लेइंग इलेव्हनच्या निवडीचे आव्हान आहे. भारताने 1992 मध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. परंतु, त्यांनी अद्याप येथे कसोटी मालिका जिंकलेली नाही.
जम्मू-काश्मीर: आज राज्याच्या काही भागात हिमवृष्टीचा इशारा
महामार्गाला बसणार फटका. प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन मजबूत करण्याच्या दिल्या सूचना आहेत. प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटतील.
जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ
दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरमध्ये सेहत आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. देशातील ही पहिलीच योजना लागू झाल्याने राज्यातील सर्व १.३० कोटी नागरिकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. एलजी मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जम्मू कन्व्हेन्शन सेंटर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.
अमित शाह इंफाळ दौऱ्यावर
दिल्ली - गृहमंत्री अमित शाह आजपासून ईशान्य भारताच्या दौवऱ्यावर आहेत. ते आसाममधील स्थानिक आदिवासी समूहाला भेटतील तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी करतील.
सुकेश प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता
मुंबई - आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जॅकलिन फर्नांडिस यांना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. महाथुग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी जॅकलिनकडून पुन्हा एकदा जबाब घेण्यात येणार आहे. गेल्या वेळी जॅकलिनची EOW टीमने आठ तास चौकशी केली होती. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, जॅकलीनच्या वक्तव्यात विरोधाभास आढळल्याने तिला बोलावण्यात आले आहे.
जम्मू : गुलाम नबी आझाद आज आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करू शकतात
माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आज आज जम्मूमध्ये नवीन पक्षाच्या नावाची घोषणा करू शकतात. आझाद रविवारी जम्मूला पोहोचले होते. त्यांनी जवळच्या नेत्यांशी दीर्घ चर्चा केली. पक्षाच्या नावाव्यतिरिक्त सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दिवसभर चर्चा झाली.
सैराट चित्रपटातील प्रिन्स होणार चौकशी
राहूरी - सैराट चित्रपटातील प्रिन्स उर्फ सूरज पवार याला राहुरी पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावले आहे. मंत्रालयात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
तळेगावात आज भाजपचे आंदोलन
पुणे - पुण्यातील तळेगावात आदित्य ठाकरे यांचे जिथे आंदोलन झाले त्याच ठिकाणी आज भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मावळचे माजी आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला नितेश राणे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे उपस्थित राहणार आहेत. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाविकास आघाडीमुळे गुजरातला गेल्याच्या आरोपातून सकाळी दहा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवसैनिकांच्या नगर ते मुंबई पदयात्रेला सुरूवात
नगर - मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील शिवसैनिक नगर ते मुंबई पदयात्रा करणार आहेत. सलग 9 दिवस ही पदयात्रा असणार आहे. आज सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही पदयात्रा निघणार आहे. हे सर्व शिवसैनिक मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात पदयात्रेने सहभागी होणार आहेत.
LETS CHECK IMPORTANT EVENTS OF COUNTRY IN ONE CLICK