ETV Bharat / city

Attack On Harshvardhan Palande : शिवसेना कल्याण उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला - दबाव तंत्र

कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुखांवर ( Kalyan East Subcity head ) धारधार तलवारीने प्राणघातक हल्ला ( lethal attack ) केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे ( Harshvardhan Palande ) असे जीवघेणा हल्ला झालेल्या उद्धव ठाकरे समर्थकाचे नाव असून यांच्यावर बुधवारी (२० जुलै ) सकाळी तलवार आणि रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Harshvardhan Palande lethal attack
हर्षवर्धन पालांडे प्राणघातक हल्ला
author img

By

Published : Jul 20, 2022, 6:32 PM IST

ठाणे - नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच उद्धव ठाकरेंना समर्थन देणारे कल्याण पूर्वेतील उपशहरप्रमुखावर (Kalyan East Subcity head ) धारधार तलवारीने प्राणघातक हल्ला ( lethal attack ) केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे कल्याण उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे ( Harshvardhan Palande ) असे जीवघेणा हल्ला झालेल्या उद्धव ठाकरे समर्थकाचे नाव असून यांच्यावर बुधवारी (२० जुलै) सकाळी तलवार आणि रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

दबाव तंत्राचा भाग असण्याची शक्यता - मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कल्याण पूर्वेतील बहुतांशी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. पालांडे यांनी आपण निष्ठावान शिवसैनिक असल्याने उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हा जीवघेणा हल्ला म्हणजे दबाव तंत्राचा ( pressure ) भाग असण्याची शक्यता ठाकरे समर्थकांकडून ( Thackeray supporters ) व्यक्त करण्यात येत आहे.

उध्दव ठाकरे समर्थक - कल्याण पूर्वेतील पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ( Shiv Sena party chief Uddhav Thackeray ) समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी चार ते पाच जणांनी हल्ला केला. शिवसैनिक पालांडे गंभीर जखमी झाले आहेत, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. पालांडे यांना त्यांच्या मित्रांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले. तेथून त्यांना पालिका रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले आहे. उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकावर हल्ला झाल्याने कल्याण डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. पालांडे हे माजी नगरसेवक आहेत.

लाठ्या काठ्यांनी हल्ला - हर्षवर्धन पालांडे यांचे समर्थक नितीन सोनावळे यांनी सांगितले, उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे हे सकाळी कल्याण पूर्वेतील पुना लिंक रस्त्यावर आपली वाट पाहत एकटेच उभे होते. मला येण्यास थोडा उशिरा झाला. तेवढ्यात एका मोटारीमधून चार ते पाच जण काठ्या, लाकडी दांडके, चाॅपर घेऊन आले. त्यांनी पालांडे यांच्या समोर वाहन उभे करून पालांडे यांनी काही कळण्याच्या आत त्यांच्यावर लाठ्या काठ्यांची झोड घातली. काहींनी पालांडे यांच्यावर तलवार व चाॅपरने वार केले. एकावेळी चार ते पाच जण अचानक अंगावर आल्याने पालांडे यांना प्रतिकार करता आला नाही. पालांडे खाली पाडण्यात आले. हल्ला केल्यानंतर मारेकरी पळून गेले. हा प्रकार पाहताच परिसरातील रहिवासी, व्यापारी घाबरून दुकाने बंद करून बसले. पालांडे यांना मारहाण झाल्याची समजताच कल्याणमधील उध्दव ठाकरे समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर पालांडे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले कि, शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सुपारी देऊन माझ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले.

महेश गायकवाडांनी आरोप फेटाळले - पालांडे यांनी केलेला आरोप शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी फेटाळला आहे. 'मला प्रसारमाध्यमांमधून कुणावर तरी हल्ला झाला असल्याचं कळले आहे. हे दुर्दैवी आहे. या घटनेशी माझा काडीमात्र संबंध नाही. मी लोकप्रतिनिधी असून, १५ वर्षांपासून समाजकारणात आहे. पोलिसांनी तपास करून कारवाई करावी,' अशी मागणी करत 'माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करू,' असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, शिवसेना उपशहरप्रमुखावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत. हर्षवर्धन पालांडे यांच्यावरील हल्ल्यामागे कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अंतर्गत गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा सुरू झालीये.

हेही वाचा - Shiv Sainik wrote letter to Uddhav Thackeray: आम्ही तुमच्यासोबत... कोल्हापुरातील शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.