ETV Bharat / city

Private Hospital Fire Audit : अग्निप्रतिबंधक नियम धाब्यावर.. मुंबईत २४ खासगी रुग्णालयांवर होणार कायदेशीर कारवाई - २४ खासगी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई होणार

अग्निप्रतिबंधक नियम न पाळल्याने ( Non-compliance With Fire Prevention Rules ) मुंबईमधील २४ खासगी रुग्णालयावर कायदेशीर कारवाई ( Legal Action On 24 Private Hospitals ) करण्यात येणार आहे. रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण ( Private Hospital Fire Audit ) करण्यात आल्यानंतर या २४ रुग्णालयांची परिस्थिती समोर आली आहे.

ग्निप्रतिबंधक नियम धाब्यावर.. मुंबईत २४ खासगी रुग्णालयांवर होणार कायदेशीर कारवाई

author img

By

Published : Apr 15, 2022, 6:35 PM IST

मुंबई - मुंबईत नेहमीच आगी लागण्याच्या घटना घडतात. अशाच आगी रुग्णालयातही लागल्या आहेत. त्यानंतर रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट करण्यात ( Private Hospital Fire Audit ) आले. अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे ( Non-compliance With Fire Prevention Rules ) नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांविरोधात कायदेशीर कारवाई ( Legal Action On 24 Private Hospitals ) केली जाईल, अशी माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कायदेशीर कारवाई होणार - काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील भांडुप येथील सनराईज रुग्णालयात ११ जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनांनंतर मुंबईतील सर्व रुग्णांलयांची पाहणी करून नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. पालिकेच्या तपासणीत अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या ६६३ रुग्णालयांना पालिकेने नोटीस बजावली होती. यावेळी नोटिशीनंतर ६३९ रुग्णालयांनी अग्नी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित केली आहे. तर २४ खासगी रुग्णालयांना त्रूटी दूर करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत संबंधित रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या २४ रुग्णालयांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कोर्टात त्यांच्या विरोधात दावे दाखल केले जातील, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

नियमानुसार कायदेशीर कारवाई - सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे पालिका प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अग्निशमन दलाकडून रुग्णालयांची तपासणी केली जाते. खासगी आणि सरकारी अशा एकूण १३२४ रुग्णालयांची तपासणी प्रशासनाकडून करण्यात आली. यातील तब्बल ६६३ ठिकाणी अग्निसुरक्षेत त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित सर्व रुग्णालयांना तातडीने नोटीस बजावण्यात आली. यात १२० दिवसांत अग्निसुरक्षेच्या यंत्रणा उभारण्यास सांगण्यात आले होते. ६६३ पैकी २४ रुग्णालयांनी नोटिशीनंतरही अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : आगींच्या घटनांनंतर सरकारने काय खबरदारी घेतली हे जनतेला कळू द्या - प्रविण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.