ETV Bharat / city

After Somaiya's allegations : सोमय्यांच्या आरोपानंतर अडकले आघाडीचे 'हे'  नेते - महाविकास आघाडीचे नेते

किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत जेवढ्या नेत्यांवर आरोप केले, तेवढ्या नेत्यांवर ईडीची कारवाई झाली आहे. त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री, आमदार तसेच नेत्यांचा समावेश आहे. त्याचा थोडक्यात आढावा आपण घेतला आहे. त्यातील बरेच जण जेलमध्ये, तर काही जेलमधून बाहेर आलेत.

Leaders accused by Somaiya
सोमय्यांनी आरोप केलेले नेते
author img

By

Published : May 27, 2022, 3:22 PM IST

मुंबई : किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत राज्यातील बड्या नेत्यांवर आरोप ( Allegations made by Kirit Somaiya ) केलेत. त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आमदार तसेच नेत्यांचा समावेश आहे. यातील अनेकांवर आजपर्यंत ईडी तसेच इतर यंत्रणांचा ससेमिरा मागे ( Action after allegations of Kirit Somaiya ) लागला आहे. टाकूयात कुणाकुणावर काय आणि कशी झाली कारवाई.

सोमय्यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपांचा याचा आढावा - किरीट सोमय्यांनी गेल्या काही वर्षांपासून विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत त्यांनी कोणत्या नेत्यांवर आरोप केले याबाबत जाणून घेऊया.

अजित पवार - किरीट सोमय्यांनी मार्च 2016 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रश्न आरोप केले होते. 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा पवार जलसंपदा मंत्री असताना झाल्याचा ठपका आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात सहभाग असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

अशोक चव्हाण - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात आदर्श गृहनिर्माण सोसायटीमधील घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्याप्रकरणी नोव्हेंबर 2010 मध्ये चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला.

छगन भुजबळ - राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच, भुजबळ यांनी आर्मस्ट्रॉंग कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनीसुद्धा बनावट असल्याचा आरोपही भुजबळ यांच्या विरोधात केला होता.

नारायण राणे - विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातही या पूर्वी किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप केला होता. राणे यांचे नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

प्रताप सरनाईक - शिवसेनेचे आमदार आणि विहंग ग्रुपचे मालक प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 250 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनीही शंभर कोटींचा मानहानीचा दावा सोमय्यांविरोधात ठोकला आहे.

भावना गवळी - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही सोमय्यांनी केली आहे.

मिलिंद नार्वेकर - शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात समुद्रकिनारी बंगला बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ - मंत्री हसन मुश्रीफ या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. साखर कारखाने आणि विविध संस्थांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांचा आहे.

श्रीधर पाटणकर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांनी 11 सदनिका गैरव्यवहारातून उभ्या केल्या असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

नंदलाल चतुर्वेदी - आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सीए नंदलाल चतुर्वेदी यांच्याकडून सात कोटी रुपयांचा बेहिशेबी व्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

संजय राऊत : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते असलेले संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 1000 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या आरोपानंतर त्यांच्यावरदेखील ईडीची कारवाई करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले.

अनिल परब : शिवसेनेचे नेते आणि सध्याचे परिवहन मंत्री असलेले अनिल परब यांच्यावर सोमय्यांनी बेनामी संपत्ती आणि मनी लाॅड्रींगप्रकरणी केलेल्या आरोपानंतर ईडीची कारवाई झाली आहे. त्यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणच्या मालमत्तेवर ईडीने छापेमारी केली आहे.

हेही वाचा : Kirit Somaiya : 'अनिल परब गजाआड जातील, सोबत आणखी चौघांचा...'; किरीट सोमैयांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.