ETV Bharat / city

Farm Laws To Be Rolled Back : कृषी कायदे रद्द: पाहा, कोण काय म्हणाले? - balasaheb thorat

Leaders Reaction On Farmer Laws Repealed
Farm Laws To Be Rolled Back : कृषी कायदे रद्द: पाहा, कोण काय म्हणाले?
author img

By

Published : Nov 19, 2021, 5:38 PM IST

Updated : Nov 19, 2021, 9:49 PM IST

21:44 November 19

सरकारची भूमिका संशयास्पदच - संतोष गव्हाणे

नांदेड -  केंद्र सरकारने केलेल्या कृषी मागे घेण्याची घोषणा केली. येणाऱ्या काळात देशात होणाऱ्या निवडणुकीवर याचा परिणाम दिसून येईल. या भीतीने हे तीनही कायदे परत घेतले आहेत. आज जरी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली असली तरी भूमिका संशयास्पदच आहे. अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा अभ्यासक संतोष गव्हाणे यांनी दिली आहे

20:07 November 19

निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी शेतकऱ्याना का तंगवले - सरोज काशीकर

निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी शेतकऱ्यानं का तंगावत - सरोज काशीकर

वर्धा - शेतकरी आंदोलनाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. कारण हे सर्व कायदे दूरदर्षी पणाने शेतकरी हिताचे हे कायदे होते. त्यामुळे आहे हे कायदे रद्द झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर हe कायदा लागू न करता रद्द करायचे होते, मग का कोर्टाच्या समिती वगैरे का केल्या. निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी शेतकऱ्यानं का तंगावत ठेवले असा सवालही शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष तथा माजी आमदार सरोज काशीकर यांनी उपस्थित केला. 

19:59 November 19

मोदींना उशिरा सुचलेलं हे शहाणपण - देवेंद्र भुयार

अमरावती -  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कायदे मतांसाठी मागे घेतले असून मोदींना उशिरा सुचलेलं हे शहाणपण असल्याची जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे .आगामी सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पराभवाच्या भीतीने मोदींनी हे कायदे मागे घेतल्याची टीका ही देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

19:41 November 19

शेतकऱ्याच्या बलिदानाचा तसेच एकजुटीचा विजय - बच्चू कडू

अमरावती - शेतकऱ्याच्या बलिदानाचा तसेच एकजुटीचा विजय आहे. हे सगळ्यात जास्त काळ चालणारे आंदोलन होते. हे सांगत त्यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांना सलाम केला आहे. मी सुध्दा यात सहभागी झालो होतो. मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. सरकारची तानाशाही शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे पूर्णपणे मोडून निघाली आहे. याचे परिणाम विधानसभेच्या आणि इतर राज्यांच्या निवडणुकांवर दिसतील, असेही जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी मत व्यक्त केले आहे. 

19:25 November 19

मोदी हरले, शेतकरी जिंकले - यशोमती ठाकूर

अमरावती -  मोदी हरले, शेतकरी जिंकले. लोकशाहीचा विजय झाला. आज फक्त घोषणा झाली मात्र, ते संसदेत जोपर्यंत होत नाही जोपर्यंत मोदींवर विश्वास ठेवण्यासारखे नाही. आपण आतापर्यंत पाहिल्यास निवडणुका जवळ आल्यावर असे सनसनाटी काही करायचे. ही त्यांची सवय आहे. आणि त्याच अनुषंगाने त्याची घोषणा केली. संगर्ष जो शेतकऱ्यांनी केला त्याला यश आले असेही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मत व्यक्त केले. 

19:15 November 19

सत्याचा आणि एकजुटीचा विजय - डॉ. अजित नवले

अहमदनगर -  केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत होते. तब्बल एकवर्षाच्या कालावधी नंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या वर किसान महासभेचे नेते डॉ. अजित नवले प्रतिक्रिया देताना विजय नेहमी सत्याचा आणि एकजुटीचा होतो हे पुन्हा एकदा सिध्द झाल्याच म्हणाले आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की वर्षभरापासून सरकारची प्रतिमा या कृषी कायद्यांमुळे आणि शेतकरी आंदोलनामुळे असंतोषामुळे मलिन झाली आहे. म्हणून तर हा घाट नाही ना सरकारने आधीच असे कायदे का पारित केले होते की शेतकऱ्यांची आंदोलन संपवावे म्हणून केलेली. ही जुमलेबाजी तर नसेल ना ? असा सवाल नवले यांनी उपस्थित केला आहे.

18:52 November 19

इतिहासात या लढाईची नोंद घेतली जाईल - बाळासाहेब थोरात

बाळासाहोब थोरात यांची प्रतिक्रीया

हे तिन्ही कायदे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हिताचे नव्हते. या बाजार समितीचे अस्तित्व संपले असते. तसेच शेतकऱ्यांना संरक्षणही मिळाले नसते. या कायद्यानंतर नाशिकमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची तक्रार नोंदवण्याची तरतूद नव्हती, असेही मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. 

17:31 November 19

कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. कृषी हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे, या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

17:31 November 19

"देर आये, दुरुस्त आये" कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने तयार केलेले तीन कृषी कायद्याचा विरोध गेल्या वर्षभरापासून सुरू होता. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या कायद्यांचा विरोध केला. शेवटी केंद्र सरकारला जनतेपुढे झुकावं लागलं. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. गुरुनानक जयंती च्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. हा दिवस देशातला ऐतिहासिक दिवस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

16:44 November 19

केंद्र सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावं लागलं - नाना पटोले

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावं लागलं आहे. जनमताच्या प्रचंड विरोधापुढे केंद्राने सपशेल माघार घेतली आहे. म्हणूनच तीन काळे कृषी कायदे मागे घेण्यात आले. मात्र, उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भीती डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.  

16:43 November 19

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय - राजू शेट्टी

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

देशातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा ऐतिहासिक विजय आहे, (Historic victory of the farmers) अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली आहे. कृषी कायदे मागे (Repeal of agricultural laws) घेतल्यानंतर शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. उशिरा का होईना सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला त्याबद्दल मोदी सरकारचे (Congratulations to Modi Government) अभिनंदन सुद्धा शेट्टी यांनी केले.

16:42 November 19

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची मस्ती व माज उतरवला - रविकांत तुपकर

रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया

सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याबाबतची घोषणा आज शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दिल्लीच्या सीमा भागामध्ये जे शेतकऱ्यांचा आंदोलन गेल्या एक वर्षांपासून सुरू आहे. त्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने हा एक विजय आहे, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली.

16:42 November 19

शेकऱ्यांच्या एकजुटीने मोदी सरकारला झुकवण्याचे काम केले - नवाब मलिक

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

16:41 November 19

'देर आये दुरुस्त आये', छगन भुजबळांचा टोला

पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

गुरुनानक जयंतीच्या (Guru Nanak Jayanti) दिवशी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे (Three agricultural laws) रद्द केले. हा निर्णय स्वागतार्ह असून उत्तर प्रदेशसह आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. लवकर हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण ठिक आहे 'देर आये दुरुस्त आये' असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोदी सरकारला लगावला आहे. केंद्र सरकारने (Central Government) कृषी कायदे रद्द केल्याने सरकारचा ‘देर है दुरस्त है’ असे धोरण समोर येत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शेतकर्‍यांचे अभिनंदन केले आहे

16:38 November 19

६३१ शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर केंद्र सरकारचा हा निर्णय - जयंत पाटील

उशीरा का होईना, निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार - जयंत पाटील

जल संपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी कृषी कायदे(FarmLaws) मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. २६ नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला(Farmer Protest) एक वर्ष होईल. जवळपास ६३१ शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

16:37 November 19

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांची कृषी कायदे रद्दवर प्रतिक्रिया

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय आधी झाला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण आपण वाचवू शकलो असतो. ऊन, वारा, पाऊस सहन करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे क्रेडिट असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Agri Minister Dada Bhuse ) यांनी दिली आहे.

15:29 November 19

Farm Laws To Be Rolled Back : कृषी कायदे रद्द: पाहा, कोण काय म्हणाले?

मुंबई - शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कृषी कायदे (Farm laws rolled back) परत घेत असल्याची मोठी घोषणा केली.  देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. तसंच, विरोधकांनीही या निर्णयाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून आलेल्या प्रतिक्रिया...

Last Updated : Nov 19, 2021, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.