ETV Bharat / city

"मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण झाल्यास त्याला महाविकास आघाडी जबाबदार" - pravin darekar news

मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार असेल, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर
"मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण झाल्यास त्याला महाविकास आघाडी जबाबदार"
author img

By

Published : Nov 1, 2020, 5:25 AM IST

मुंबई - मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार असेल, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. सर्व समाजाचे हक्क अबाधित ठेऊन एकमेकांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. दोन्ही समाजांचा एकमेकांच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र दोन्ही समाजाचे आरक्षण अबाधित ठेऊन त्या-त्या समाजाला आरक्षणाचा फायदा मिळवून दिला पाहिजे, असे मत दरेकरांनी मांडले. योग्य समन्वय साधून दोन्ही समाजाला न्याय मिळावा, अशी भाजपाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.

"मराठा व ओबीसी समाजात वाद निर्माण झाल्यास त्याला महाविकास आघाडी जबाबदार"

मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी मराठा आरक्षाच्या मुद्द्यावरून दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर पुढील सुनावणीसाठी सरकारी वकील वेळेत न पोहोचल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र ओबीसी सामाजाने याला विरोध दर्शवलाय. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नसून ओबीसीतील आरक्षण कोटा देण्यास त्यांनी नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील वाटाघाटींना सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण न्यायालयात संवैधानिक पातळीवर टिकण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या मुद्दयावर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पुस्तक प्रकाशन सोहळा

फडणवीस सध्या क्वारन्टाइन असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. कोरोनाच्या कठीण प्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी, तसेच निसर्ग चक्रीवादळाची परिस्थिती व महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रसंग अशा प्रत्येक संकटाच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरे करत, जनतेच्या व्यथा समजून घेतल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘जनसेवक’ हा विशेषांक तयार करण्यात आला आहे. हा विशेषांक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.