मुंबई - राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा खासदार श्रीकांत शिंदे कौशल्य विभागाचे सहसचिव तथा महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी कौशल्य विकास उपायुक्त डी डी पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते
![महाराष्ट्र स्टार्टअप नाविन्यता यात्रेचा शुभारंभ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-cm-on-startup-yatra-7209781_15082022140829_1508f_1660552709_896.jpg)
![महाराष्ट्र स्टार्टअप नाविन्यता यात्रेचा शुभारंभ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16108697_625_16108697_1660559086764.png)
१० हजारापासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके कृषी शिक्षण आरोग्य शाश्वत विकास स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता ई प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय तज्ञ समितीसमोर अंतिम सादरीकरण होईल राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल त्याचबरोबर जिल्ह्यांमध्ये उत्तम ३ विजेत्यांची निवड केली जाईल २५ हजार १५ हजार व १० हजार अशी पारितोषिके देण्यात येतील विभागस्तरावर ६ सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व ६ सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल राज्यस्तरावर १४ विजेत्यांना पारितोषिके दिली जातील यामध्ये प्रथम पारितोषिक १ लाख रुपये तर व्दीतीय पारितोषिक ७५ हजार रुपये आहे याशिवाय विजेत्या संकल्पनांना प्री-इन्क्युबेशन तसेच इन्क्युबेशन सहाय्य बीज भांडवल निधी सहाय्य स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ञ व संस्थांद्वारे मार्गदर्शन सॉफ्टवेअर क्लाऊड क्रेडीट्स यांसह इतर आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे
स्टार्टअप यात्रेचे आयोजन राज्यातील सहा विभागातून स्टार्टअप यात्रेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होत असल्याने आनंद होत आहे हा उपक्रम महिनाभर चालणार असून यातून नवोद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक युवावर्ग आहे वेगवेगळ्या क्षेत्रात ते नवनवीन संकल्पना विकसीत करीत आहेत राज्याच्या तळागाळातून अशा नावीन्यपूर्ण संकल्पनांचा व नवउद्योजकांचा शोध घेऊन त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याद्वारे कृषी शिक्षण आरोग्य शाश्वत विकास स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता ई-प्रशासन अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येईल अशी माहिती विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दिली राज्याच्या स्टार्टअप परिसंस्थेला अधिक चालना देण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले
हेही वाचा - Indian Independence Day दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी परीधान केलेले वेगवेगळे पोशाख