ETV Bharat / city

Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा : राजेश टोपे - लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
author img

By

Published : Jan 30, 2022, 4:03 PM IST

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. माझे डॉ. प्रतित सामदानी यांच्याशी बोलणे झाले आहे. याआधी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याने व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. व आता फक्त ऑक्सिजनच द्यावा लागत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

  • I spoke with Dr Pratit Samdani who is treating singer Lata Mangeshkar. She's recovering, was on a ventilator for some days, but is better now. She is no more on ventilator. Only oxygen is being given to her. She is responding to the treatment: Maharashtra Minister Rajesh Tope pic.twitter.com/qOSP2H9OLl

    — ANI (@ANI) January 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लता मंगेशकर यांना कोरोनामुळे न्युमोनियाचीही लागण झाल्या निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्युमोनिया झाल्यामुळे त्यांना अति दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारास त्या उत्तम प्रतिसाद देत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांचा व्हेटिलेटर दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला होता. मात्र, त्यांना अद्याप अति दक्षता विभागातच ठेवण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्यांचे निरीक्षण करत आहेत.

चुकीची माहिती नको

काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची खोडसाळ माहिती व्हायरल झाली होती. यावेळी मंगेशकर कुटूंबियांच्यावतीने कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पसरवू न देण्याचे आवाहन करण्यात आले होते. लता दीदींनी त्यांच्या ट्विटरवरून चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर यांची जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पॉझिटिव्ह आली होती. न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली. बीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये डॉ. प्रतीत समदानी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. सध्या मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सतत प्रकृतीबाबत माहिती देणे शक्य होत नाही. तरी त्रासदायक अफवा पसरवू नका, असे आवाहन लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून केले आहे.

हेही वाचा - Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.