मुंबई - कोरोनामुळे गेल्या 24 तासात राज्यात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 153 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 217 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यात 22 पोलीस अधिकारी आणि 195 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय
राज्यात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हा 20 हजार 954 इतका आहे. यात 2 हजार 295 पोलीस अधिकारी, तर 18 हजार 659 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात आतापर्यंत 3 हजार 721 कोरोनाबाधित पोलीस हे उपचार घेत असून, यात 472 पोलीस अधिकारी तर 3259 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 17 हजार 6 पोलीस हे कोरोनातून उपचार घेऊन बरे झाले असून, यामध्ये 1801 पोलीस अधिकारी तर 15205 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात आतापर्यंत राज्यभरात कलम 188 नुसार 2 लाख 60 हजार 174 गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांवर हल्ला होण्याच्या 358 घटना राज्यात घडल्या आहेत. या संदर्भात 894 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 89 पोलीस जखमी झाले असून, वैद्यकीय पथकावर 76 प्रकरणात हल्ला झाल्याचं समोर आले आहे.