मुंबई - गणपती उत्सवात Ganeshotsav 2022 सर्वच गणेश भक्तांना ओढ असते ती लालबागच्या राजाच्या ( Lalbaugcha Raja ) दर्शनाची. देशातील काही प्रमुख मानाच्या गणपतींमध्ये लालबागच्या राजाचा समावेश होतो. गणपती उत्सवात या राजाची देशभर चर्चा असते. या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वस्त्र अलंकार सोहळा. या गणपतीची दोन वेळा संपूर्ण वस्त्र बदलली जातात. याच्या वेळा सुद्धा ठरलेल्या आहेत. मध्यरात्री तीन वाजता हा वस्त्रालंकार सोहळा ( Clothing Ceremony Lalbaugcha Raja ) पार पडला.
वस्त्रालंकार ही एक मानाची आणि पवित्र अशी गोष्ट - या संदर्भात माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले की, "लालबागच्या राजाचा वस्त्रालंकार सोहळा ही एक खरोखरच मानाची आणि पवित्र अशी गोष्ट आहे. लालबागच्या राजाची ( Lalbaugcha Raja ) वस्त्र दिवसातून दोन वेळा बदलली जातात. एक पहाटे तीन वाजता आणि दुसऱ्या वेळी दुपारी तीन वाजता ही वस्त्र बदलली जातात. या वेळेनुसार राजाची शाल, कंबरपट्टा, पितांबर हे सर्व काही वस्त्र बदलली जातात. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य आहेत रुपेश मनोहर पवार हे राजाचे वस्त्र बदलतात. त्यांना मागच्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे. विशेष म्हणजे जेव्हा हा वस्त्रालंकार सोहळा पार पडतो त्यावेळी काही ठरलेल्या सदस्या व्यतिरिक्त आत मध्ये कोणीही नसते. बाप्पाच्या दर्शनाचा पडदा देखील पाडला जातो आणि मग बाप्पाची वस्त्र बदलली जातात.
हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 : 'येथे' विराजमान झालेत चॉकलेटचे गणराय; दर्शनासाठी भाविकांची गर्दी