ETV Bharat / city

निवडणुकीदरम्यान 'लाख' मोलाची कामगिरी बजावणार

निवडणूक काळात लाखेच्या ६ लाख कांड्‌या आणि ४ लाख मेणबत्यांचा होणार वापर

author img

By

Published : Mar 30, 2019, 5:03 AM IST

लाखे’ची लाल मोहोर लावताना

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे,त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी लाखेचे६ लाख८१ हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

सरकारी कामातील जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो, शासकीय कारवाईत‘लाखे’ची लाल मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांनाही सील केले जाते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट,व्हीव्हीपॅट यंत्र,मतदारांची नावे असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर,ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सीलबंद केले जाते. सील करण्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते असे निवडणूक विभागाने सांगितले.

प्रत्येक केंद्रावर ६ लाखेचे नग -
यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी६नग या प्रमाणे राज्यासाठी६लाख८१हजार८०० नग लाख मागविण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येणार आहे.

४ लाख ५५ हजार मेणबत्त्या -
लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे४लाख५५ हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे,पेन्सिल, खोडरबर,शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहे.

Intro:मुंबई -
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’ मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी लाखेचे 6 लाख 81 हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील ही पहिलीच वेळ असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. Body:सरकारी कामातील जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाईत ‘लाखे’ची लाल मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्ही पॅट यंत्र यांनाही सील केले जाते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्ही व्ही पॅट यंत्र, मतदारांची नावे असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर, ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सिलबंद केले जाते. सील करण्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते असे निवडणूक विभागाने सांगितले.

प्रत्येक केंद्रावर 6 लाखेचे नग -
यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे राज्यासाठी 6 लाख 81 हजार  800 नग लाख मागविण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येणार आहे.

4 लाख 55 हजार मेणबत्त्या -
लाख वितळवून मतदान यंत्रे सिलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे 4 लाख 55 हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे, पेन्सिल, खोडरबर, शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत.Conclusion:null

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.