ETV Bharat / city

जाणून घ्या, सीईटीसह उच्च व तंत्र शिक्षणाच्या परीक्षेच्या सुधारित तारखा

author img

By

Published : Sep 23, 2020, 10:30 PM IST

राज्याच्या सीईटी विभागाने चौथ्यांदा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभाग
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा विभाग

मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागासोबत विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षाच्या सुधारीत तारखा जाहीर केल्या आहेत. यात उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा समावेश आहे. पीसीबी ग्रुपच्या परीक्षा या १ ते ९ ऑक्टोबर आणि पीसीएम ग्रुपच्या १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणऱ्या एम. आर्किटेक, या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा ३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहेत. तर एमसीए, एचएमसीटी, बी.एचएमसीटी या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा या १० ऑक्टोबर रेाजी घेतल्या जाणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उच्च शिक्षण विभागातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या नवीन तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. एम. पीएडसाठीची परीक्षा ही ३ ते ७ ऑक्टोबर, एम. एडची ३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.

बीपीएड, एम.पीएड, बीए, बीएससी, बीएड, तसेच बीएड आणि बीएडसह (ईएलसीटी) एमएड, विधी महाविद्यालयातील विधी पाच वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा ही ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहेत. तर तीन वर्ष विधी परीक्षेची तारीख मात्र अद्याप निश्चित करण्यात आली नाही. त्यासाठीची सुधारीत तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने सीईटी सेलने निश्चित केलेल्या अनेक परीक्षांचे वेळापत्रक हे कोलमडले आहे. त्यामुळे यात तब्बल तीनवेळा बदल करावा लागला. मात्र आता या परीक्षा आयोजित करण्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकिट परीक्षेच्या पूर्वी चार दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.