ETV Bharat / city

Pradosh News: श्रावणातील प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व, जाणून घ्या, - Shravan month Trayodashi Tithi

पुराणात प्रदोष व्रतास विशेष महत्त्व ( Importance Of Pradosh Vrata ) सांगितले आहे. या वर्षी दुसरा प्रदोष व्रत 9 ऑगस्ट 2022 रोजी श्रावण महिन्यात येत आहे. हा दिवस मंगळवारी असल्याने याला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाईल. या व्रतामध्ये नियमानुसार शिव आणि पार्वतीची पूजा ( pooja of Shiva and Parvati ) करणाऱ्या व्यक्तीला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. आणि त्याच्या जीवनात शांती नांदते, असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया भौम प्रदोष व्रताची पूजा पद्धती आणि महत्त्व.

Pradosh Vrata
प्रदोष व्रत
author img

By

Published : Aug 8, 2022, 10:40 AM IST

मुंबई - पुराणात प्रदोष व्रतास विशेष महत्त्व सांगितले ( Importance Of Pradosh Vrata ) आहे. या वर्षी दुसरा प्रदोष व्रत 9 ऑगस्ट 2022 रोजी श्रावण महिन्यात येत आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला भौम प्रदोष व्रत म्हटले जाईल. प्रदोष व्रतामध्ये नियमानुसार शिव आणि पार्वतीची पूजा ( pooja of Shiva and Parvati ) करणाऱ्या व्यक्तीला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या जीवनात शांती नांदते, असे मानले जाते.

प्रदोष व्रताची पद्धत - व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर घरातील मंदिराची स्वच्छता करून देवासमोर दिवा लावावा. संध्याकाळी प्रदोष काल मुहूर्तावर भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करताना चंदन, धूप, दिवा, फळे, फुले इत्यादी सर्वशिव आणि पार्वला अर्पण करावेत. या व्रताच्या पहिली पद्धतीमध्ये भक्त दिवसाचे २४ तास कडक उपवास करतात. व ते रात्रही जागे राहतात. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. संध्याकाळी शंकराची पूजा केल्यावर उपवास मोडला जातो. दिवसाची प्रार्थना आणि पूजा संध्याकाळच्या वेळी केली जाते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगदी आधी. सूर्यास्ताच्या एक तास आधी भाविक स्नान करून भगवान शिवाची पूजा करतात. शिवलिंगाला दूध, दही, तूप अशा पवित्र पदार्थांनी अभिषेक करून शिवलिंगावर बेलची पानेही अर्पण केली जाते. आणि धार्मिक विधीनंतर भक्त प्रदोष व्रत कथा ऐकतात. यावेळी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केला जातो.

प्रदोष व्रत 2022 शुभ मुहूर्त - पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी ( Shravan month Trayodashi Tithi ) मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:४५ वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ही तारीख दुसऱ्या दिवशी, 10 ऑगस्ट, बुधवारी दुपारी 2:15 वाजता समाप्त होईल.

हेही वाचा :उस्मानाबाद जिल्ह्यातील रामलिंग मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.