मुंबई - आले आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओक्के अशा अनपेक्षित घोषणा देत पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारची भंबेरी Monsoon Assembly Session First day उडविली. पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवसही वादळी ठरणार आहे. अतिवृष्टी भागातील शेतकरी, कायदा व सुव्यवस्था मुद्द्यांवरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकारने विरोधकांच्या आक्रमणाची धार बोथट करण्यासाठी रणनीती आखली Shinde Government monsoon session आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बैठक बंडखोरी करत विभागात स्थापन करत केला. ३९ आमदारांना फोडून सुरत व्हाया गोवा गुवाहाटी गाठले. एक एक मंत्री आणि आमदार या गटात सामील झाले. दरम्यान, आमदारांना ५० कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. विरोधकांनी हाच धागा पकडत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिंदे गटाविरोधात ५० खोके एकदम ओक्के, ईडी सरकार हाय हाय, आले रे आले, गद्दार आले घोषणा देत विधान भवनचा परिसरातून opposition leaders agitation session सोडला.
विरोधीपक्षाचा आज प्रस्ताव असणार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अभिनंदन प्रस्ताव, नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय आणि शोक प्रस्तावानंतर पहिल्या दिवशीचे कामकाज तहकूब करण्यात आले. अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. विरोधीपक्षाचा आज प्रस्ताव असणार आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि शिंदे सरकारची स्थापना या मुद्द्यावरून विरोधक सरकारला सभागृहात आणि सभागृहाबाहेर धारेवर धरण्याची शक्यता आहे.
संतोष बांगर यांना मुख्यमंत्र्यांनी दिली समज सत्तेत येताच आमदारांची दादागिरीची वक्तव्ये, अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न झालेली मदत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. प्रश्न जरी बरोबर असला तरी तुमच्या रिअॅक्ट करण्याची पद्धत बरोबर नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांना समजावलं. तसेच यापुढे असे प्रकार टाळते आले तर पाहा, अशी सूचनाही केली.
अजिबात शांत बसू नका विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तरे द्या, अजिबात शांत बसू नका. आपलं सरकार कसं चांगलं काम करते आहे, हे लोकांना पटवून सांगा, असे आदेश देतानाच आपण लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपलं वर्तन व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्याकडून कोणतंही चुकीचं वर्तन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना दिला.
अंबादास दानवे यांना रोखण्यासाठी नवी रणनीती राज्यात शिवसेनेत बंडखोरी केलेल्या शिंदे गटावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. अशातच शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेल्या अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अंबादास दानवे शिंदे गटाला नियमित आव्हान देत असतात. आता सभागृहात शिंदे गट विरोधात अंबादास दानवे असा सामना रंगणार आहे. सरकारमधील मंत्र्यांना उशिराने खाते वाटप दिले आहे. विरोधी पक्षनेते दानवे नवनिर्वाचित मंत्र्यांना यावरून विधान परिषदेत कोंडीत पकडतील. संबंधित मंत्री यावेळी अडचणीत येऊन सरकारची गोची होऊ नये, यासाठी अंबादास दानवे यांना रोखण्यासाठी नवी रणनीती आखली असून विधान परिषदेच्या सभागृह येथे पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचे बोलले जाते.
हेही वाचा CM Eknath Shinde जरा धिराने घ्या, संतोष बांगर प्रकाश सुर्वेंना मुख्यमंत्र्यांची तंबी