ETV Bharat / city

मुंबईत 'या' ९ केंद्रावर होणार मुलांचे लसीकरण, डोसनंतर चॉकलेटही दिले जाणार - मुंबई मुलांचे लसीकरण कसे करावे

कोविन अॅपवर नोंदणी न केलेल्या मुलांनाही लसीकरण केंद्रांवर थेट लस दिली जाणार आहे. लहान मुलांना फक्त कोव्हॅक्सिन लस दिली जाणार ( COVAXIN vaccination for children ) असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील ९ जम्बो करोना केंद्रात लसीकरणाची ( 9 Jumbo vaccination center in Mumbai ) सुविधा पुरविण्यात आली आहे.

children vaccination in Mumbai
मुलांचे लसीकरण
author img

By

Published : Jan 1, 2022, 5:03 PM IST

मुंबई - देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम येत्या ३ जानेवारीपासून राबवण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील ९ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात ( children vaccination in Mumbai ) आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मुलांना याचा लाभ घेता येईल. यासाठी आजपासून (१ जानेवारी) कोविन अॅपवर ऑनलाईन नाव नोंदणीला ( COVID App registration for vaccination ) सुरुवात झाली आहे.

कोविन अॅपवर नोंदणी न केलेल्या मुलांनाही लसीकरण केंद्रांवर थेट लस दिली जाणार आहे. लहान मुलांना फक्त कोव्हॅक्सिन लस दिली जाणार ( COVAXIN vaccination for children ) असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-Special Campaign for Vaccination : आधार, पॅन, कोणतेच ओळखपत्र नसेल तरीही कोल्हापूरात लस मिळणार

मुंबईत ९ लसीकरण केंद्रांवर मुलांचे लसीकरण -
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ या आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण कार्यक्रमात सुरुवातीला प्राधान्य गटाचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका व सरकारी रुग्णालयात ३०२, खासगी रुग्णालयात १४९ अशी एकूण ४५१ कोविड १९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत १ कोटी २० लाख ६५ हजार ८३० एवढ्या लशींचे डोस प्राप्त झाले आहेत. ९९ लाख २४ हजार ७२१ लाभार्थ्यांना (१०७ टक्के ) पहिला डोस व ७९ लाख १७ हजार ७०३ एवढया लाभार्थ्यांना (८६ टक्के) दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानंतर १५ ते १८ वयोगटातीला लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला पालिकेने ९ लसीकरण केंद्र निश्चित केली आहेत.

हेही वाचा-Vaccine For Children : पुढील सहा महिन्यांत लहान मुलांसाठी लस लाँच केली जाईल - अदर पुनावाला

मुलांना चॉकलेट -
मुंबईतील ९ जम्बो करोना केंद्रात लसीकरणाची ( 9 Jumbo vaccination center in Mumbai ) सुविधा पुरविण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत मुलांना लस दिली जाणार आहे. मुंबईतील बीकेसी जंबो कोविड सेंटरमधील व्हॅक्सिनेशन केंद्रामध्ये लहान मुलांना बसण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच मुलांना डोस दिल्यानंतर त्यांना चॉकलेटदेखील दिले जाणार असल्याची माहिती कोविड सेंटरचे डीन डॉ. राजेश ढेरे ( Dr Rajesh Dhere on children vaccination ) यांनी दिली.

हेही वाचा-Kishori Pednekar on Childrens vaccination : महानगरपालिका लहान मुलांच्या लसीकरणासाठी सज्ज - किशोरी पेडणेकर

लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही -
आधारकार्ड नसलेल्या, रस्त्यावर राहणाऱ्या, तुरुंगामधील कैदी, तृतीय पंथीयांचे लसीकरण पालिकेने केले आहे. आधारकार्ड नसलेल्या मुलांच्या शाळेच्या, कॉलेजच्या ओळखपत्रावर लसीकरण केले जाणार आहे. कोणतेही ओळखपत्र नसलेल्या बाल सुधार गृह, अनाथ आश्रम आदी ठिकाणी असलेल्या मुलांचेही लसीकरण केले जाईल. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. १५ ते १८ वयोगटातील मुलेही बहुतेक करून ९ ते १२ वी दरम्यानची असणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या कॉलेजला एखादे लसीकरण केंद्र संलग्न करून लसीकरण केले जाईल. तसेच कॉलजेमध्येही लसीकरण केले जाईल. झोपडपट्टी विभागात असलेल्या लसीकरण केंद्रावरही लहान मुलांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना -

  • सन २००७ अथवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहणार आहेत.
  • आजपासून लाभार्थ्यांना कोविन अॅपवर मोबाइल नंबर नोंदणी सुरू आहे.
  • लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करून लसीकरण करण्याचीही सुविधा दिली जाणार आहे.
  • १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी केंद्रावर फक्त कोवॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
  • स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसेल अशा ठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.

    या ठिकाणी होणार लसीकरण -
  1. भायखळा आर. सी. कोविड लसीकरण केंद्र
  2. सायन सोमय्या जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  3. वरळी एनएससीआय डोम, जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  4. बांद्रा बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र एच / प
  5. गोरेगाव नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  6. मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  7. दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  8. कांजूरमार्ग क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ह्स जम्बो लसीकरण केंद्र
  9. मुलुंड आर सी जम्बो कोविड लसीकरण केंद्र

पंतप्रधानांकडून लसीकरणाची घोषणा-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा 25 डिसेंबरला केली. फ्रंटलाईन वर्कर्सना ( Booster Dose for Frontline Workers ) व आरोग्य क्रमचारी ( Booster Dose for Health Workers ) बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.