ETV Bharat / city

Kisan Railway Maharashtra : शेतकऱ्यांसाठीची किसान रेल्वे सुसाट, ६ महिन्यात ९०० फेऱ्या, ३.१० लाख टन कृषी उत्पादनांची वाहतूक

देशभरातील शेतकरी बांधवांना त्यांचा शेतमाल देशभरातल्या बाजारपेठेत विकता यावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत ( Kisan Railway Maharashtra ) आहे. अवघ्या सहा महिन्यातच मध्य रेल्वेवरून ( Central Railway ) देशभरात ९०० फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. याद्वारे ३.१० लाख टन कृषी उत्पादनांची वाहतूक ( Transportation Of Agricultural Products ) करण्यात आली आहे.

किसान रेल्वे
किसान रेल्वे
author img

By

Published : Jan 4, 2022, 7:10 PM IST

मुंबई - भारतीय रेल्वेने शेतकर्‍यांसाठी सुरु केलेल्या किसान रेल्वेला महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळत ( Kisan Railway Maharashtra ) आहे. मध्य रेल्वेवर सुरु झालेली भारताची पहिली किसान रेल आता ट्रेंड सेटर बनली आहे. गेल्या १६ महिन्यात मध्य रेल्वेवरून ( Central Railway ) ९०० किसान रेल्वेच्या फेऱ्या झाल्या असून, त्यांच्यामार्फत संपूर्ण देशभरात ३ लाख १० हजार टन वजनी फुले, फळे, भाज्या यांसारख्या नाशवंत पदार्थांची वाहतूक ( Transportation Of Agricultural Products ) केली. किसान रेल्वेने जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५० टक्के अनुदानासह, कृषी उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये विक्रीची संधी उपलब्ध होते.

किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्या पूर्ण

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पहिली किसान रेल सुरू झाल्यापासून, मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्यांमधून ३ लाख १० हजार ४०० टन नाशवंत मालाची वाहतूक केली आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल आणि २८ डिसेंबर २०२० रोजी किसान रेलची १०० वी फेरी चालवण्याचा मान मध्य रेल्वेला मिळाला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी वेबलिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. किसान रेल्वे ५०० वी फेऱ्या १२ ऑगस्ट २०२१ रोजी चालली. आता, किसान रेल्वेची ९०० वी फेरी १ जानेवारी २०२२ रोजी सावदा येथून आदर्श नगर, दिल्ली येथून निघाली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे इंजिन

सोलापूर भागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिर्च; लातूर आणि उस्मानाबाद भागातून फुले, नाशिक भागातून कांदा, भुसावळ व जळगाव भागातून केळी, नागपूर भागातून संत्री व इतर फळे आणि भाज्या दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये लवकर पोहोचतात. किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठ्या बाजारपेठांसह चांगले उत्पन्न मिळते. त्यांच्या मालाला चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी अपव्यय यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात शेतीपूरक अनुकूल बदल झाला आहे. किसान रेल ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी समृद्धीचे आणि भरभराटीचे इंजिन बनले आहे.

महाव्यवस्थापकांनी केले कौतुक

शासनाने 'ऑपरेशन ग्रीन - टॉप टू टोटल' ( Operation Green Top To Total ) या 'आत्मनिर्भर भारत' ( Atmanirbhar Bharat Initiative ) अभियानाच्या अंतर्गत सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देखील देण्यात येत आहे. यामुळे रेल्वे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी पहिली पसंती बनली आहे. ३ लाख १० हजार टन फळे आणि भाज्यांची वाहतूक करण्यात आली अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.