मुंबई - दापोली येथील अनधिकृत साई रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले असताना हा रिसॉर्ट माझा नाही, अशी ठाम भूमिका माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab Sai Resort in Dapoli) यांनी घेतली आहे. या संदर्भात आता किरीट सोमय्या यांनी पत्रक काढून (Kirit Somaiya has revealed the brochure) दापोली येथील साई रिसॉर्ट कशा पद्धतीने अनिल परब यांचा आहे याची सविस्तर माहिती उघड केली आहे.
ग्रामपंचायत मध्ये दिला होता अर्ज? : 26 जुन 2019 रोजी अनिल परब यांनी स्वतःच्या सहीने मुरुड ग्रामपंचायत, दापोली येथील सरपंच यांच्या नावाने पत्र दिले होते. 'विभास साठे कडून दापोली साई रिसॉर्टची जमीन अनिल परबने घेतली व त्यावरील रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकाम अनिल परबच्या नावे करण्यात यावे', असा अर्ज ही दिला होता. या रिसॉर्टची वर्ष 2019-20 ची घरपट्टी 14 नोव्हेंबर 2019 रोजी 46,806 रुपयांची अनिल परब यांनी स्वतःच भरली होती. तसेच वर्ष 2020-21 ची रुपये 46,806 ची घरपट्टी ही 17 डिसेंबर 2020 रोजी अनिल परब यांनी भरली होती. यांच्या पावत्याही आमच्या कडे उपलब्ध आहे, असे सोमय्या यांनी सांगितले आहे.
महावितरण चे बिल अनिल परब भरायचे? : महावितरण ने किरीट सोमय्या यांना दिलेल्या माहितीत अनिल परब यांनी या रिसॉर्टच बांधकाम करण्यासाठी 3 फेज मीटर वीज जोडणी 05 मार्च 2020 रोजी घेतली होती, अशी माहितीही दिली आहे. या मीटरच्या वीज पुरवठ्या प्रमाणे मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत या रिसॉर्टच बांधकाम गतीने करण्यात आल्याचे दिसत आहे. या 12 महिन्यांत वीजेचे बिल अनिल परब यांच्याच नावाने येत होते, अनिल परब स्वतःच्या बँक खात्यातून वीज देयकाचे भरणा करत होते. 04 मार्च 2021 रोजी या वीज जोडणीचे सदानंद कदम यांच्या नावे हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी? : जुलै, २०१८ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या शपथपत्रात अनिल परब यांनी दापोली रिसॉर्ट, दापोली रिसॉर्टच्या जमीनीचे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे घोषित केले होते. मूळ जमीन मालक विभास साठे यांच्याकडून एक कोटी रुपये देऊन दापोली रिसॉर्टची मुरुड गावातली जमीन विकत घेतले असल्याचे, अनिल परब यांनी आपल्या निवडणुकीच्या मालमत्ते मध्ये लिहले होते. या संबंधी अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्याची सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. सोमवारी सदानंद कदम यांच्या याचिकेसोबत आता किरीट सोमय्या यांच्या इंटरवेंशन याचिकेची सुद्धा सुनावणी होणार आहे.Kirit Somaiya