ETV Bharat / city

Kirit Somaiya याकूब मेमन कबर सजावटी प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; किरीट सोमैयांचा हल्लाबोल - Criminal charges against guilty officials

Kirit Somaiya राज्यात नाट्यमय सत्तातरानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकामागोमाग एक दणके बसत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे संजय राऊत हे जेलमध्ये असून, त्यांच्या डावा हात असणारे अनिल परब यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असताना आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांचाही एक घोटाळा भाजप नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी उघड केला आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya
author img

By

Published : Sep 8, 2022, 4:43 PM IST

मुंबई राज्यात नाट्यमय सत्तातरानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एकामागोमाग एक दणके बसत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे संजय राऊत हे जेलमध्ये असून, त्यांच्या डावा हात असणारे अनिल परब यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असताना आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर यांचाही एक घोटाळा भाजप नेते किरीट सोमैया Kirit Somaiya यांनी उघड केला आहे. 500 कोटींच्या या घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय आहे प्रकरण ? मुंबई जोगेश्वरी येथे 2 हजार वर्षांपूर्वीपासून महाकाली गुंफा आहे. दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये ही गुंफा व या गुंफेला जाणारा रस्ता यासाठी रवींद्र वायकर यांनी माफिया कॉन्ट्रॅक्टर व मुख्यमंत्री कार्यालयाची मदत घेऊन यासाठी 500 कोटीचे बिल्डर कन्स्ट्रक्शन अधिकार अविनाश भोसले यांना दिले, असा आरोप किरीट सोमैया Yakub Memon Grave Controversy यांनी केला आहे. अविनाश भोसले हे सध्या जेलमध्ये असून याप्रकरणी डेव्हलपमेंट राईट मिळवण्यासाठी शाहिद बालवा कंपनीने एप्लीकेशन केले व त्यास मंजुरी दिली. असे सोमैयांने सांगितले आहे. तसेच हा 500 कोटींचा मोठा घोटाळा असून लवकरच याची शहानिशा समोर येईल असे किरीट सोमैयां यांनी सांगितले आहे.

याकूब मेमन कबरी वरून वाद ? 1993 बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीवरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. मुंबईतील बडा Mumbai bomb blast 1993 कब्रस्तान येथे याकूब मेमन याची कबर असून त्याच्यावर केलेल्या सजावटी प्रकरणी आता राजकारण तापू लागलेले असताना यामध्ये भाजप नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी सुद्धा उडी घेतली आहे. किरीट सोमैया यांनी याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे यांनी केले मेमनचे स्मारक ? याप्रकरणी बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, ज्या 1993 बॉम्बस्फोट चा प्रतिकार स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या जनतेने केला व याच कटाचा सूत्रधार याकूब मेमन याचे स्मारक बनवण्यासाठी ठाकरे सरकार व्यस्त होते, असा आरोप करत त्यांनी तेव्हाच्या ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 1993 च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जखमी झालेल्या दोन व्यक्तींना सुद्धा त्यांनी याप्रसंगी प्रसार माध्यमांच्या समोर आणलं. ईश्वर साकडे व नरेश सराफ या 2 व्यक्ती अजूनही त्या धक्क्यातून सावरले नसताना दुसरीकडे ठाकरे सरकार मेमन याचे स्मारक करण्याचा प्रयत्न करत आहे, हा निर्लज्जपणाचा कळस आहे असेही किरीट सोमैया म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.