मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया आणि नील सोमैया यांनी त्यांची भेट ( Kirit Somaiya Meet CM Eknath Shinde ) घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दलचे त्यांनी एक ट्वीट केले. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ( Kirit Somaiya On Uddhav Thackeray ) करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिला आहेत.
-
मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
किरीट सोमैयाचे ट्वीट - 'मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले' असे ट्वीट करुन त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.
नवलानी यांना क्लीनचिट - शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर ईडीची भीती दाखवून अनेक व्यापारी व बांधकाम व्यवसायिकांकडून पैसे उकळण्याचा व खंडणी वसुलीचा आरोप केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झाली. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर काही तासातच नवलानी यांना क्लीनचिट मिळाली आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेले किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत, संजय पांडे आता पंतप्रधान मोदींची माफी मागावी.
किरीट सोमैया आणि नील सोमैयांना दिलासा - भाजप नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांना त्याच बरोबर पोलिसांना उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तर त्यांना या संदर्भात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) दिले आहेत. मात्र या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती भारती डांगरे समोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले आहे की चौकशीदरम्यान किरीट सोमैया आणि त्यांचे पुत्र निल सोमैया (Neil Somaiya) यांना अटक झाल्यास 50 हजाराच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने कायम ठेवला आहे.
हेही वाचा - Mumbai High Court: भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा