ETV Bharat / city

मुंबईतील किंग सर्कल, गांधी मार्केट परिसर होणार पूरमुक्त; माहुल पंपिंग स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा

दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते. जरासा पाऊस पडला तरी हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केट, किंग सर्कल, सायन, चेंबूर या भागात पाणी जमा होते. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, चेंबूर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशन (Mahul pumping station) उभारले जाणार आहे.

Mahul pumping station
Mahul pumping station
author img

By

Published : Nov 22, 2021, 8:57 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते. जरासा पाऊस पडला तरी हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केट, किंग सर्कल, सायन, चेंबूर या भागात पाणी जमा होते. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, चेंबूर भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. पंपिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध झाली असून त्यापैकी १५ हजार ५०० चौरस मीटरवर पंपिंग स्टेशन (Mahul pumping station) उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे गांधी मार्केट, किंग सर्कल, चेंबूर, नेहरु नगर आदी भाग पूरमुक्त होण्यास मदत होणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता, गांधी मार्केट, अंधेरी सब वे पाण्याखाली जातात. हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी ब्रिमस्टोवॅट प्रकल्प राबवण्यात येत असून ५ पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होत आले आहे. तर आता गांधी मार्केट, किंग सर्कल चेंबूर या सखल भागात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील समन्वयाअभावी पालिकेला पंपिंग स्टेशनसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. मात्र आता माहुल पंपिंग स्टेशन उभारणे ही तातडीची गरज असल्याने पालिकेने आता जागेच्या बदल्यात जागा मिळवून प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेबाबतचा प्रस्ताव उद्या मंगळवारी होणा-या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सहा पंपिंग स्टेशन -

मुंबईत अतिवृष्टीत सखल भागात पाणी साचण्याचे प्रकार वारंवार घडतात. यातच गेल्या काही वर्षांपासून पावसाची तिव्रता आणि अनिश्चितात वाढल्याने व कमी वेळात अतिवृष्टी होण्याचे प्रकार वाढले आहेत. थोड्या पावसांतही सखल भागांसह रेल्वे रूळांवर पाणी साचण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पालिकेने २००६ मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत इतर उपाययोजनांसोबतच आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे.

माहुल पम्पिंग स्टेशन (Mahul pumping station)-

प्रमुख अभियंता मलनिस्सारण विभाग हे मागील अनेक वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता प्रयत्नात आहे. केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा उपलब्ध करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला जात होता, मात्र याला यश आले नव्हते. अखेर खाजगी विकासकाकडून जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या जागेच्या बदल्यात टीडीआर किंवा अन्य ठिकाणी जागा देऊन माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनची गरज लक्षात घेता, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) यांनी मौजे आणिक न.भू.क्र. १अ/११, १अ/१२ या दोन भूखंडांमधील १५५०० चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात घेतली जाणार आहे. महानगरपालिकेच्या भूखंड न.भू.क्र. १अ/१४ मधील १५५०० जागा मे. अजमेरा रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच पालिका आयुक्तांनीही याला मंजुरी दिली आहे.

माहुल खाडीची रुंदी वाढणार -

पंपिंग स्टेशनसाठी निवडण्यात येणाऱ्या जागेवर अतिक्रमण नाही. तसेस नियमानुसार केंद्र सरकारच्या सीआरझेड-आयबी अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार वन व पर्यावरण खात्याची परवानगी मिळणेही शक्य आहे. या पंपिंग स्टेशनमुळे माहुल खाडीची रुंदी ५६ मीटरपर्यंत वाढेल. मात्र ही जागा नाल्याच्या बाजूला आहे. त्यामुळे पाणी वाहून नेण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.