ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिका, मदतनीसांचे आझाद मैदानावर आंदोलन धडकणार - म्युनिसिपल मजदुर युनियन चिटणीस अरुण नाईक

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत काम करणाऱ्या ९०० बालावड्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका मदतनीस यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हजारो शिक्षिका, मदतनीस मोठ्या संख्येने १९ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी 'आझाद मैदान' येथे धडकणार आहेत अशी माहिती म्युनिसिपल मजदुर युनियनचे चिटणीस अरुण नाईक यांनी कळविले आहे.( Kindergarten teachers and helpers strike at Azad Maidan )

Kindergarten teachers helpers strike
मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी शिक्षिका, मदतनीसांचे आझाद मैदानावर आंदोलन धडकणार
author img

By

Published : Oct 7, 2022, 3:44 PM IST

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत काम करणाऱ्या ९०० बालावड्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका मदतनीस यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हजारो शिक्षिका, मदतनीस मोठ्या संख्येने १९ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी 'आझाद मैदान' येथे धडकणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदुर युनियनचे चिटणीस अरुण नाईक ( Municipal Workers Union secretary Arun Naik ) यांनी दिली आहे.( Kindergarten teachers and helpers strike at Azad Maidan )

खाजगी संस्थेच्या ९०० बालवाड्या -

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत संपूर्ण मुंबई शहरात लहान मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने वय वर्षे ३-५ वयोगटातील मुलांसाठी संपूर्ण मुंबई शहरात जवळपास ९०० बालवाड्या खाजगी संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येतात. सदर बालवाड्यांत प्रत्येक बालवाडी गणिक एक शिक्षिका व मदतनीस अशा एकूण १८०० कर्मचारी वर्ग असून गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिके मार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्यांना न्याय देण्याचे अत्यंत उत्तम काम करत आहे. याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील पटसंख्या वाढण्यात झालेला आहे.

शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम - बालवाडी शिक्षिका मदतनीस आपल्या स्वत:च्या मुलांप्रमाणे ह्या बालवाडी मुलांची देखभाल करीत असून त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करीत आहेत. परंतु ह्या सर्व शिक्षिका व मदतनीस यांचे अनेक वर्षे प्रलंबित प्रश्नांकडे मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग त्या दृष्टीने दखल घेत नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांची दखल ना बालवाडी चालक संस्था घेत आहे ना मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी. यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. या संबंधित बालवाडी संस्थाचालक यांचेकडून ह्या शिक्षिका मदतनीस यांना मुंबई महानगरपालिकेने देय केलेले मानधन देखिल वेळेवर दिले जात नाही. कधी कधी ३-३ महिने मानधन दिले जात नाही. संस्थांची 'हम करे सो कायदा' ही प्रवृत्ती वाढली असल्याने शिक्षिका मदतनीस हे हया संस्थाकडून बाहेर पडू उच्छित असून शिक्षिका मदतनीस यांची सर्वांची जबाबदारी CDO अंतर्गत मुंबई महानगरपालिकेने घ्यावी अशी मागणी आहे. त्याच बरोबर मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी, सी. एच. व्ही कामगारांप्रमाणे किमान एक पगार सानुग्रह अनुदान, बोनस देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

या आहेत मागण्या : वाढीव पगार देण्यात यावा, पगार वेळेवर देण्यात यावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाप्रमाणे ह्या बालवाडी शिक्षिका मदतनीस यांचे वयोमान ६५ वर्षा पर्यंत किंवा जे जोपर्यंत काम करू शकतील तोपर्यंत करण्यात यावे, बालवाडी मुलांना उपाशी पोटी शिकावे लागत असल्याने त्यांचा विचार करून त्यांना एकवेळचे पौष्टीक आहार, भोजन देण्यात यावा. जेणेकरून मुलांना उपाशीपोटी शिकावे लागणार नाही. अशा अनेक मागण्या घेवून युनियनच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडीत शिकवणाऱ्या शिक्षिका, मदतनीस या मोठ्या संख्येने १९ ऑक्टोबर २०२२ रोजी महापालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी आझाद मैदान येथे धडकणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.